नागपूर - आगामी निवडणुकांमध्ये विदर्भात राष्ट्रवादीला चांगला यश मिळेल अशी अपेक्षा आहे. ठिकठिकाणची परिस्थिती वेगवेगळी असते. त्या-त्या ठिकाणच्या स्थिती प्रमाणे निर्णय होईल. आघाडीचे प्रयत्न करू,न झाल्यास आम्ही एकट्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांना ( Elections to local bodies ) सामोरे जाऊ असं वक्तव्य केलं आहे माजी गृहमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील ( Dilip Walse Patil ) यांनी केले आहे. ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. वळसे पाटील राष्ट्रवादीचा प्रभारी म्हणून कार्यकर्त्यांच्या तयारीचा आढावा घेतला.
मला गृहमंत्री का केलं ते माहीत नाही - महाविकास आघाडी सत्तेत असताना अजित पवार यांनी गृहमंत्रीपदाची इच्छा वक्तव्य केली होती,त्यावर विचारले असता ते म्हणाले की मला गृहमंत्री करण्याचा राष्ट्रवादीच्या वरिष्ठांनी जो निर्णय घेतला होता,तेव्हा तो कोणत्या परिस्थितीत घेतला होता,ते मी सांगू शकत नाही. मी त्या बद्दल बोलणार ही नाही.