ETV Bharat / city

Women Trafficking Racket : बांगलादेशी महिलांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड; दहा महिलांची सुटका - महिलांची तस्करी रॅकेटचा भांडाफोड

काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना बेकायदेशीर भारतात आणल्यानंतर देहव्यवसायात लोटले जाणार होते. अशा दहा महिलांची सुटका करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या सर्व महिला आणि एक पुरुष हावडा-सुरत एक्सप्रेसने प्रवास करत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याची सूचना यासंदर्भात दहशतवाद विरोधी पथकाकडून ( Anti-Terrorism Squad ) नागपूर पोलिसांना प्राप्त झाली. त्यानंतर नागपूर पोलिसांनी देखील तत्परता दाखवत सर्व महिलांची सुटका केली आहे.

पोलीस उपायुक्त नागपूर
पोलीस उपायुक्त नागपूर
author img

By

Published : Nov 26, 2021, 3:08 PM IST

Updated : Nov 26, 2021, 3:22 PM IST

नागपूर - बांगलादेशमध्ये राहणाऱ्या महिलांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड ( Bangla Women Trafficking Racket ) करण्यात नागपूर गुन्हे शाखा पोलिसांना ( Nagpur Crime Branch Police ) मोठे यश आले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या तरुणींना भारतात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना बेकायदेशीर भारतात आणल्यानंतर देहव्यवसायात लोटले जाणार होते. अशा दहा महिलांची सुटका करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या सर्व महिला आणि एक पुरुष हावडा-सुरत एक्सप्रेसने प्रवास करत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याची सूचना यासंदर्भात दहशतवाद विरोधी पथकाकडून ( Anti-Terrorism Squad ) नागपूर पोलिसांना प्राप्त झाली. त्यानंतर नागपूर पोलिसांनी देखील तत्परता दाखवत सर्व महिलांची सुटका केली आहे.

माहिती देतांना पोलीस उपायुक्त

पोलिसांच्या तपासात या सर्व महिला बांगलादेश येथील रहिवासी असल्याचे पुढे आले आहे. मात्र या आंतरराष्ट्रीय टोळीचा सूत्रधार पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मानवी तस्करी टोळीने या महिलांना बेकायदेशीरपणे भारतात आणल्यानंतर त्यांना देशातील मोठ्या शहरांमध्ये देहव्यवसायात लोटले जाणार होते. पोलिसांनी नागपूर रेल्वे स्थानकावर या महिलांची सुटका केली. तेव्हा संपूर्ण गाडी तपासली असता मुख्य सूत्रधार हाती लागलेला नाही. पोलिसांनी ज्या दहा बांगलादेशी महिलांची सुटका केलेली आहे. त्यांच्याकडे आपले नागरिकत्व सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा नसल्याचा खुलासा पोलिसांच्या तपासात झाला आहे.

परराष्ट्र मंत्रालयामार्फत चौकशी होणार!

नागपूर गुन्हे शाखा पोलीस सामाजिक सुरक्षा विभागाच्या मदतीने या मानवी तस्करीच्या प्रकरणाचा तपास करणार आहेत. त्याकरिता प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. यामध्ये बांगलादेशमधून या महिलांना पाठवणार आहे. भारतात या महिलांना रिसिव्ह करणारा आणि सुरक्षित ठिकाणी पोहचवणाऱ्या आरोपींची माहिती पोलिसांच्या हाती लागलेली आहे.

हेही वाचा - Nagpur : विद्यार्थिनीवर गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला अटक

Last Updated : Nov 26, 2021, 3:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.