नागपूर - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray letter to CM Uddhav Thackeray ) आज ( मंगळवारी ) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मनसेच्या कार्यकर्त्यांना दाहशवाद्या सारखे शोधत असल्याचे म्हटले आहे. आरोपीला शोधणे हे पोलिसांचा कामच आहे. पोलीस आपले काम करत आहे. ज्या मनसे नेत्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांनी ताबडतोब पोलिसांकडे शरण आले पाहिजे, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे. शिवाय कसे वागावे याचे मार्गदर्शनही राज ठाकरे यांनी करावे, असा खोचक टोलाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील ( Home Minister Dilip Walse Patil ) यांनी लगावला. ते नागपुरात बोलत होते.
फरार असलेल्या मनसे नेत्यानी शरण आले पाहिजे. पोलीस कायद्याप्रमाणे आपले काम करत असतात. त्यामध्ये चुकीचे काहीही नाही. पोलीस आपल्या पद्धतीनेच काम करणार आहे. त्यामुळे कोणीही नाराज होण्याचे कारण नाही, असे उत्तरही गृहमंत्र्यांनी राज ठाकरेंना दिले आहेत. नागपूरच्या रेल्वे स्टेशनव परिसरात स्फोटके आढळली आहे. त्याचा तपास सुरू करण्यात आला आहे. परंतु अजूनपर्यंत त्या तपासात स्पष्टता आलेली नाही. तेच हरियाणा येथील खलिस्तानी प्रकरणात पोलीस पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. जे आरोपी सापडलेले आहे, त्यांची कस्टडी महाराष्ट्र पोलीस मागितली असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Thackeray Vs Thackeray : 'आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका'; राज ठाकरेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र