ETV Bharat / city

चौकशीत सत्य पुढे येईल - गृहमंत्री अनिल देशमुख - अनिल देशमुख नागपूर

माजी पोलीस आयुक्तांनी जे आरोप केलेत त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्याना मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली होती. मंत्री मंडळाने ते मान्य केली असून, रिटायर्ड जज या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. त्या चौकशीत जे सत्य असेल ते पुढे येईल, असे देशमुख आज नागपुरात म्हणाले.

home minister anil deshmukh, anil deshmukh reaction over parambir singhs allegations, अनिल देशमुख, परमबीर सिंग यांचे पत्र
अनिल देशमुख
author img

By

Published : Mar 28, 2021, 1:04 PM IST

Updated : Mar 28, 2021, 1:46 PM IST

मुंबई - माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांनी सचिन वाझेंना शंभर कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश दिले होते, असा आरोप लावला. यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली गेली. मात्र, पक्षाकडून आणि मुख्यमंत्र्यांकडून त्यांचा राजीनामा घेतला नाही. या सर्व प्रकरणावर चर्चा सुरू असताना आज गृहमंत्री देशमुखांनी यावर प्रतिक्रिया दिली. 'माजी पोलीस आयुक्तांनी जे आरोप केले त्याची चौकशी व्हावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्याना मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली होती. मंत्री मंडळाने ते मान्य केली असून, रिटायर्ड जज या प्रकरणाची चौकशी करणार आहेत. त्या चौकशीत जे सत्य असेल ते पुढे येईल,' असे देशमुख म्हणाले.

अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया..

शिवसेनेचे मुखपत्र सामनातून आज गृहमंत्र्यांवर सडेतोड टीका करण्यात आली. पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त सॅल्यूट घेण्यासाठी नसते, अशी सणसणीत टीका करण्यात आली. याबद्दल प्रश्न विचारला असता गृहमंत्र्यांनी त्यावर उत्तर देणे टाळले. आता चौकशी झाल्यानंतरच पुढील बाबी स्पष्ट होतील.

Last Updated : Mar 28, 2021, 1:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.