नागपूर - नेहमी मनाचा मोठेपणा सिद्ध करणाऱ्या भारतीय नागरिकांच्या हृदयाचा आकार हा पाश्चिमात्य देशातील नागरिकांच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी कमी असल्याचा दावा भारतीय संशोधकांनी केला आहे. या संशोधकांमध्ये नागपुरातील प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉक्टर शंतनू सेनगुप्ता यांचा देखील समावेश आहे. या संदर्भात अजून खूप अभ्यास होणे बाकी आहे. हृदयाचा आकार छोटा असल्याने उपचाराच्या पद्धतीत देखील बदल अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.
धूम्रपान करणारे रुग्ण, मधुमेहाचा आजार असणारे आणि हृदयाचा आजार असणाऱ्यांचे हृदय सामान्यतः मोठे आढळून येतात ते असामान्य आल्याचा निष्कर्ष देखील डॉक्टर शंतनू सेनगुप्ता यांनी काढला आहे.
खानपान आणि व्यसनांच्या अतिरेकामुळे भारतीयांना हा आजार -
सर्वाधिक हृदयविकाराचे रुग्ण भारतात आढळून येतात. खानपान आणि जीवघेण्या व्यसनांच्या सवयीमुळे हा आजार भारतीयांमध्ये वाढला असल्याचा निष्कर्ष गेल्या अनेक वर्षांपासून झालेल्या संशोधनातून पुढे आला आहे. मात्र हृदयावर नव्याने झालेल्या संशोधनात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नागपूर येथील रहिवासी असलेले डॉक्टर शंतनू सेनगुप्ता यांच्यासह आपल्या देशातील काही नामवंत हृदय रोग तज्ज्ञांच्या टीमचे अमेरिकेतील "द इंटरनॅशनल जर्नल ऑफ कार्डिओव्हॅस्कुलर इमेजिंग'मध्ये यांचे संशोधन प्रकाशित झाले आहे. ज्यामध्ये भारतीय नागरिकांच्या हृदयाचा आकार हा पाश्चिमात्य देशातील नागरिकांच्या हृदयाच्या तुलनेत १५ ते २० टक्क्यांनी कमी असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
भारतातील सहा केंद्रांवर झाली तपासणी -
भारतातील सहा केंद्रात हजारो भारतीयांच्या हृदयाची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये ४०० रुग्ण हे नागपुरातील आहेत. या सर्वांच्या हृदयाचा आकार हा १५ ते २० टक्क्यांनी लहान असल्याचं पुढे आले आहे. भारतीय नागरिकांची शरीरयष्टी लक्षात घेता हृदयाचा आकार छोटा असल्याने कोणतेही कॉम्पलिकेशन नसल्याचं ते म्हणाले आहेत.
चीनच्या नागरिकांच्या हृदयाची तुलना करणे बाकी -
शरीरयष्टीच्या बाबतची चीनसह अन्य काही देशांच्या नागरिकांच्या हृदयाच्या आकाराची तुलना भविष्यात केली जाऊ शकते, ज्यामध्ये धक्कादायक निष्कर्ष देखील पुढे येण्याची शक्यता आहे. मुळात आपल्या हाताची मूठ जेवढी असले तेवढा हृदयाचा आकार समजला जातो. त्या अंदाजानुसार चीन आणि काही देशातील नागरिकांच्या हृदयाचा आकार आणखी कमी असू शकतो.