नागपूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात अपशब्द ( Offensive Words Against CM Thackeray ) वापरल्याप्रकरणी खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) आणि आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांच्या विरोधात नागपुरच्या शिवसैनिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. राणा दाम्पत्यावर तात्काळ गुन्हा नोंद ( Shivsainik Demands To File FIR ) करावा, अशी मागणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
भावना दुखावल्या : राणा दाम्पत्याने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालिसा पठण ( Hanuman Chalisa At Matoshree ) करण्याचा संकल्प केला होता. मात्र त्यानंतर मुंबईत तणावाची स्थिती निर्माण झाल्याने पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली आहे. त्यावेळी राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात अपशब्द वापरले होते. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत. नागपूर पोलिसांनी शिवसैनिकांच्या भावना समजून घेत राणा दाम्पत्याच्या विरोधात नागपुरातही गुन्हा नोंद करावा अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.
शिवसैनिकांची घोषणाबाजी : शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात जाऊन शिवसेनेला आव्हान देणाऱ्या राणा दाम्पत्याविरोधात शिवसैनिकांनी नागपुरात जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी शिवसेना महानगरप्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आलं. राणा दाम्पत्य जाणीवपूर्वक महाराष्ट्राचे वातावरण आणि सलोखा बिघडवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.