ETV Bharat / city

गडचिरोलीच्या विकासासाठी तडजोड केली जाणार नाही - एकनाथ शिंदे - गडचिरोली पोलीस

आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांचे पुनर्वसन केले जाईल. पण गडचिरोलीत शांतता राहिली पाहिजे, त्यासाठी कुठली तडजोड सरकारने केली नाही आणि करणार नाही, असेही नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. ते नागपुरात बोलत होते.

शिंदे
शिंदे
author img

By

Published : Nov 15, 2021, 11:47 PM IST

Updated : Nov 16, 2021, 12:22 AM IST

नागपूर - आपल्या जीवाची कुठलीही पर्वा न करता गडचिरोली जिल्ह्याच्या सी 60 च्या जवानांनी 26 माओवाद्यांना कंठस्नान (Naxals killed in Gadchiroli) घालून नक्षली कारवाईला जबर धक्का दिला आहे. यामुळे गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस आणि जवानांचे कौतुक झालेच पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी मी स्वतः बोलणार आहे. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांचे पुनर्वसन केले जाईल. पण गडचिरोलीत शांतता राहिली पाहिजे, त्यासाठी कुठली तडजोड सरकारने केली नाही आणि करणार नाही, असेही नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Guardian Minister Eknath Shinde) म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना एकनाथ शिंदे यांनी आज (सोमवारी) नक्षलवादी हल्ल्यात जखमी झालेल्या चार जवानांवर नागपूरच्या ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना भेट दिली.

माहिती देतांना मंत्री एकनाथ शिंदे

'नक्षली कारवाईना जरब बसेल'

गडचिरोली जिल्ह्याच्या पोलिसांनी माओवाद्यांना कंठस्नान घालताना स्वतःच्या जीवाची कुठलीही पर्वा केली नाही. यावेळी काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असताना सुद्धा त्यांनी मोठे शौर्य दाखवत आपला लढा कायम ठेवला आणि नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून एक मोठी कारवाई यानिमित्ताने केली आहे. त्यामुळे यानंतर नक्कीच नक्षली कारवाईना जरब बसेल, असा विश्वास पालकमंत्री शिंदे यांनी बोलून दाखवला. मोठ्या धैर्य दाखवत ही कारवाई केली आहे. सरकार गडचिरोली जिल्ह्याच्या पोलिसांच्या पाठीशी सदैव असणार आहे. तसेच त्यांची ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याने त्यांचे कौतुक करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी स्वतः बोलून त्याचे मनोबल आणि त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी जे काही बक्षीस असो सत्कार किंवा गौरव करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचेही ते पालकमंत्री शिंदे म्हणालेत.

'जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तडजोड केली जाणार नाही'

या सगळ्यात गडचिरोली जिल्ह्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्याठिकाणी आरोग्य सुविधा, शिक्षण, कनेक्टिव्हिटी, रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर उभारले जात आहे. इतर जिल्ह्याप्रमानेच गडचिरोली हा जिल्हाही मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही प्रयत्न आहे ते केले जात आहे. यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि इतर विभागाचे मंत्रीही साथ देत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही रस्ते विकासासाठी निधी मागितला असून त्यांनीही मदत केली आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. त्यातही लवकर यश मिळेल, मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा सुरू आहे, असेही ते म्हणालेत.

'आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांचे पुनर्वसन करण्यासाठी विविध योजना'

गडचिरोली जिल्ह्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम सुरू आहे. यात आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांसाठी नवीन योजना राबविल्या जात आहे. आर्थिक नियोजनात एक वेगळा हेड निर्माण करून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. त्या तरुणांना कायमस्वरूपी काम धंदा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी भांडवल दिले जात आहे. त्यांनी नक्षली काम सोडून मुख्य प्रवाहात आले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जात आहे. यातून गडचिरोली जिल्ह्यात शांतता राखून त्या लोकांचे जीवन सुकर झाले पाहिजे यासाठी कुठलीच तडजोड करणार नाही, असेही एकनाथ शिंदे म्हणालेत. नक्षल कारवाईचे पत्र आणि धमक्या हे काही पहिल्यांदा आले असे नाही. त्यामुळे मी आता त्या सगळ्या गोष्टींना विसरलो आहे. माझावर अशा पत्रांचा काहीही परिणाम झाला नाही. माझे एकच ध्येय आहे. ते म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचा विकास. माओवादीना काय आरोप करायचे आहे ते करु द्या. सुरजागढ प्रकल्प हा हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. त्यात हजारो लोकांना काम मिळत आहे. त्यामुळे मोठा इन्फ्रास्ट्रक्चर उभे झाले. त्याचा फायदा लोकांच्या रोजगारात सुद्धा होणार आहे, असेही ते पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा - Maharashtra violence हिंसक घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई होईल- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

Last Updated : Nov 16, 2021, 12:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.