नागपूर - विदर्भात मोठ्या प्रमाणात पर्यावरणावर प्रेम करणारी माणसे आहेत. येथे चांगले वन आहेत. व्याघ्र प्रकल्प आहेत. त्यामुळे विदर्भात पर्यावरण जपायला मोठा वाव असल्याचे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी ( Aaditya Thackeray On Vidarbha Tour ) म्हटलं. ते नागपूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले की, सगळीकडे शासकीय दौरे सुरु आहेत. चंद्रपूरच्या नागरिकांनी रामाळा तलाव संदर्भात काही पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी तक्रारी केल्या होत्या. तिथे जाऊन सुशोभीकरण आणि स्वच्छतेबाबात बैठक घेणार ( Aaditya Thackeray On Ramala Lake ) आहे.
विदर्भात पर्यावरण जपायला मोठा वाव
नांदगावमधील खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पाच्या फ्लाय एशचा डम्पिंग बंद केलेला आहे. तेथील नागरिकांनी काही तक्रारी केल्या होत्या. उद्या तिथे जाणार जाऊन कायमचा मार्ग काढला जाईल. विदर्भात पर्यावरण जपायला मोठा वाव आहे. इथे चांगली वने आहेत, पर्यावरणावर प्रेम करणारी माणसं आहेत. तसेच, अजनी वनच्या बाबत पर्यावरण वाचवून विकास होत असेल तर मी त्या बाजूने आहे, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आम्ही निवडणूक लढवत असतो. आमच्या सगळ्या आघाड्या आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन निवडणूक लढवतो. आम्ही सर्वजण मिळून एक टीम आहे, असे सुद्धा आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - Sanjay Raut On Bjp : संजय राऊतांचा भाजपाला टोला; म्हणाले, "ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून..."