नागपूर: १४ ऑक्टोबर १९५६ रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर Dr Babasaheb Ambedkar यांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर Nagpur sacred initiation grounds 5 लाख अनुयायांच्या साक्षीने बौद्ध धर्माची धम्म दीक्षा स्विकारली होती. या घटनेला आज ६६ वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र, ६६ वर्षांपूर्वी घडलेल्या त्या ऐतिहासिक घटनांच्या प्रत्येक क्षणांचे साक्षीदार असलेल्या ८५ वर्षीय गीता ताकसांडे आजीने त्यासर्व घटना डोळ्यात साठवून ठेवल्या आहेत. बाबासाहेब श्याम हॉटेलमध्ये मुक्कामी होते, तेव्हा गीता आजी आणि बाबासाहेबांची भेट झाली होती. त्या भेटीच्या आठवणी आजीच्या मनात आजही जश्याच्या तश्या ताज्या आहेत. गीता आजी गेल्या ३५ वर्षांपासून दीक्षाभूमीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसून बाबासाहेबांचे फोटो विक्री करतात. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमी येथे येणारे अनुयायी गीता आजींची भेट घेतात, आणि आजीकडून बाबासाहेबांची गाथा ऐकूणच पुढे जातात.
अशी झाली बाबासाहेबांसोबत भेट महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्यक्षात जवळून बघितले असे आता काहीच लोकं शिल्लक आहेत. त्यापैकी एक आहेत, ८५ वर्षीय आजी गीता ताकसांडे. बाबासाहेबांना याची देही याची डोळा बघणाऱ्या आजी अवघ्या १७ वर्षांच्या होत्या. तेंव्हा त्यांच्या जीवनात तो आनंदाचा क्षण आला. बाबासाहेब १९५६ ला नागपूरच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा ते श्याम हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. त्यावेळी सीताबर्डी भागातील शेकडो समाजबांधवांनी बाबासाहेबांना बघण्यासाठी आणि भेटण्यासाठी श्याम हॉटेल बाहेर गर्दी केली होती. त्या गर्दीत १७ वर्षीय गीता सुद्धा होत्या. बाबासाहेब दिसतात गीता त्यांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकली, तेव्हा बाबासाहेबांनी तिला पाया पडू दिल्या नाही. तिच्या डोक्यावरून हात फिरवत आस्थेने विचारपूस केली. त्यावेळी बाबासाहेबांनी गीता यांना यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला होता, असे गौरवोद्गार आजीने काढले. बाबासाहेबांनी दिलेला आशीर्वाद गीता आजीसाठी आयुष्यभराचा अभिमान देऊन गेला होता.
लॉंग मार्च आजींनी भोगला तुरुंगवास मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरांच्या लढ्यात टाकसांडे आजीचा सक्रिय सहभाग होता. प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वात त्याही लॉन्ग मार्चमध्ये सहभागी झाल्या होत्या. पोलिसांच्या लाट्या काठ्या देखील त्यांनी खाल्ल्या आहेत. एवढेच काय तर 4 दिवस पुण्याच्या येरवडा तुरुंगात ही त्यांनी काढले होते, असे त्या अभिमानाने सांगतात.
गीता आजींचा जीवनप्रवास गीता आजी यांचे अवघ्या ९ वर्षांच्या असताना त्यांचे लग्न झाले. आजीचे वय पंधरा वर्षे असताना त्यांच्या पदरात दोन मुले होती. त्या केवळ ३० वर्षांच्या असताना गीता आजीच्या पतीचे निधन झाले. त्यामुळे 3 लेकरांची जबाबदारी निराधार झालेल्या गीता आजींवर आली होती. उदरनिर्वाहाचा मोठ्ठा प्रश्न आजी समोर उभा असताना त्यांनी एकाला बाबासाहेबांचे फोटो आणि मूर्ती विक्री करताना बघितले. आजींनी साठवलेल्या सर्व पैश्यातुन बाबासाहेबांचे फोटो आणि गौतम बुद्धांच्या मूर्ती विकत घेतल्या आणि तेव्हापासून सुमारे ४० वर्ष आजी दीक्षाभूमी समोर फोटो आणि मूर्ती विक्रीचे दुकान लावले आहेत.