नागपूर - खंडणी बहाद्दर शिवसेनेचा नागपूर शहर प्रमुख मंगेश कडवला गुन्हेशाखा पोलिसांनी शहरातील पांढराबोरी परिसरातून अटक केली आहे. याआधी पोलिसांनी कडवच्या पत्नीला सुद्धा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर मंगेश कढववर आत्मसमर्पण करण्यासाठी दबाव वाढला होता. मात्र, गुन्हेशाखा पोलिसांनी त्याला पळून जात असताना बेड्या ठोकल्या आहे. चार दिवसांपूर्वीच मंगेश कडवची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती.
मंगेश कडव विरुद्ध धमकावून खंडणी मागणे, संपत्तीवर अवैध कब्जा करणे, ती रिकामी करण्यासाठी पुन्हा खंडणी मागणे, दुकान आणि फ्लॅट विक्रीच्या व्यवहारात फसवणूक करणे असे अनेक आरोप लागले लागले होते. त्यानंतर शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींनी हकालपट्टीची कारवाई केली होती. कडव विरुद्ध नागपूर शहरातील पाच पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हे दाखल होताच आरोपी कढवने लपाछपीचा खेळ सुरू केला होता. शहरातील विविध भागात पोलिसांनी त्याचा शोध घेतला तेव्हा तो मिळून आला नाही. म्हणून पोलिसांनी दोन गुन्हात सहआरोपी असलेल्या त्याच्या पत्नीला अटक केली होती. त्यानंतर मंगेश कडव आत्मसमर्पण करेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, तसं काहीही होत नसल्याचे दिसताच पोलिसांनी पुन्हा कडवच्या अटकेचे प्रयत्न सुरू केले होते. दरम्यान तो पांढराबोडी परिसरात त्याच्या मित्राकडे येणार असल्याची माहिती मिळल्यानंत त्याभागात सापळा रचण्यात आला होता. त्यावेळी मंगेश कडव हा एका एका अॅटोमधे लपून जात असल्याचे निदर्शनात येताच त्याला अटक करण्यात आली.