ETV Bharat / city

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी गणरायाचं आगमन - nagpur ganpati news

दरवर्षी मोठ्या उत्साहात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नापुरातील निवासस्थान गणरायाची स्थापना होत असते. यंदाही गडकरी निवासस्थानी बाप्पांचे आगमन झाले. केवळ कुटुंबीयांच्या उपस्थितीत आणि सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करत नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले आहेत.

नितीन गडकरींच्या घरी गणपती
नितीन गडकरींच्या घरी गणपती
author img

By

Published : Aug 22, 2020, 3:54 PM IST

नागपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी सुद्धा लाडक्या गणरायाचे आगमन झाले आहे. गेल्या अनेक वर्षांची परंपरा जपत गडकरींच्या निवासस्थानी 'श्रीं' मोठ्या थाटात विराजमान झाले. यावेळी नितीन गडकरी यांच्यासह कांचन गडकरी आणि कुटुंबीय उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या घरी 'बाप्पा'

नागपुरातील नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी गणरायाची स्थापना करण्यात आली. यावेळी गडकरींनी सहकुटुंब गणेशाची पूजा आणि आरती केली. गणेशोत्सवाच्या दिवशी गडकरी न चुकता नागपुरातील निवासस्थानी हजर राहून स्वतः बाप्पाची स्थापना करतात. यानुसारच यंदाही गडकरी कुटुंबीयांनी भक्तीभावाने बाप्पांची स्थापना केली आहे.

हेही वाचा - ईटीव्ही भारत विशेष : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

सध्या उपराजधानी नागपुरात कोरोनाचे संकट गडद झाले असताना गडकरी यांच्या घरी गर्दी होऊ नये, याकरिता विशेष काळजी घेण्यात आली. यावर्षी कुणालाही घरी प्रवेश नसेल, अशी सूचना आधीच देण्यात आली होती. केवळ कुटुंबीयांच्या उपस्थितीत आणि सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे पालन करत नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान झाले. तसेच पुढील दहा दिवस याच पद्धतीने बाप्पांची सेवा केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - सुखकर्ता.. दु:खहर्ता... मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरातील आरती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.