ETV Bharat / city

Hit Wave In Nagpur : नागपुरात तीन दिवसात आढळले चार मृतदेह; उष्माघाताने दगावल्याचा संशय

शहरातील विविध भागात चार अनोळखी व्यक्ती रस्त्यावर आढळले असून पोलिसांनी माहिती मिळताच त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे सलग 45 अंशांच्यावर तापमानाचा पारा पाहता, रस्त्यावर बसणाऱ्या चौघांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Nagpur Temperature
वाढत्या तापमानामुळे सुनसान झालेले रस्ते
author img

By

Published : Jun 9, 2022, 12:39 PM IST

नागपूर - शहरात गेल्या तीन दिवसात चार मृतेदह आढळल्याने खळबळ उडाली आहे. नागपुरातील तापमान 45 अंशाच्या वर असल्याने हे मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तापमान वाढल्याने नागपुरातील रस्ते सुनसान पडले आहेत.

उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचा संशय - नागपूर शहरातील विविध भागात चार अनोळखी व्यक्ती रस्त्यावर आढळले असून पोलिसांनी माहिती मिळताच त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यामुळे सलग 45 अंशांच्यावर तापमानाचा पारा पाहता, रस्त्यावर बसणाऱ्या चौघांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या चौघांच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. प्रथमदर्शनी तरी यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून उष्णघात असल्याची शंका व्यक्त होत आहे.

शहरातील विविध भागात आढळले बेशुद्ध व्यक्ती - नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस परिसरातील अशोक चौक येथे 50 वर्षीय पुरुष बेशुद्ध आढळून आला. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत जाहीर केले होते. दुसरी घटना सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गड्डीगोदाम भागात उघड झाली. यात अंदाजित वय 50 ते 55 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध म्हणून रुगणालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. तिसऱ्या घटनेत दोन जण 8 जूनला बेशुद्ध आढळून आले होते. यात एका महिलेचा समावेश होता. यातील एक जण छावनी भागातील असून दुसरी घटना अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत टिबीवॉर्ड परिसरातील आहे. या दोघांनाही डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.