नागपूर - कोरोनामुळे नागपूरची परीस्थिती तशी भीषणच म्हणाची लागेल. या कठीण काळात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री डॉ नितीन राऊत, महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह प्रशासकिय अधिकारी आपआपल्या परीने प्रचंड प्रयत्न करीत आहेत. रुग्णांना ऑक्सिजन, रेमिडेसिवीर, बेड्स प्रयत्न करूनही मिळत नाहीत ही देखील सत्य बाब आहे. शहरातील सर्व डॉक्टर, हॉस्पिटल्स निश्चितच त्यांच्या त्यांच्या बाजुने प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. परंतु, दुदैवाने या शहरातील अॅडमिट असलेल्या पेशन्टची स्थिती अत्यंत भयानक होत चाललेली आहे. एकीकडे कोरोनाचा मार, एकिकडे आमचे आरोग्य मंत्री सांगतात एकही रूपया डिपॉझिट द्यायचे नाही आणि दुसरीकडे या शहरातील काही हॉस्पिटल्स दीड ते पाच लाख डिपॉझिट घेतल्याशिवाय रुग्णालयात दाखलच करून घेत नसल्याचा आरोप माजी महापौर संदीप जोशी यांनी केला आहे.
नागपूर मध्ये एकेका घरातील तीन-तीन व्यक्ती हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतात आहे आणि केवळ डिपॉझिटसाठी तुम्ही लाखो रुपये मागितले जात आहेत. डिपॉझिट दिले नाही तर शहरातील अनेक हॉस्पिटल मरत असलेल्या रुग्णाला भरतीदेखील करत नाहीत, असा देखील आरोप त्यांनी केला आहे. काही डॉक्टर निश्चितच चांगले काम करीत असताना काही डॉक्टर, काही हॉस्पिटल्स् दुर्दैवाने मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे संदीप जोशी म्हणाले आहेत. यावरती प्रशासनाने प्रत्येक हॉस्पिटलला ऑडिटर दिलेला आहे. माझे अनेक मित्र डॉक्टर आहेत. सहज एकाशी बोललो त्याने सांगितले, की ऑडिटर हॉस्पिटल्सशी सेट झालेल आहे, पण दुर्दैवाने अनेक ऑडिटर सेट झालेले असल्याचा गंभीर आरोप माजी महापौर संदीप जोशी यांनी केला आहे. त्यामुळे गरिबांची प्रचंड आर्थिक लूट सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
रुग्णांनी आपले बिल तपासून घ्या
एकीकडे शासनाने खासगी हॉस्पिटलला स्पष्ट सांगितले, की 80 % शासकीय दराने तर 20 % खासगी दराने रुग्ण अॅडमिट करावे, परंतु याकडे प्रशासनाचे संपूर्ण दुर्लक्ष आहे. काही हॉस्पिटल्स या दुर्लक्षाचा वापर करून ऑडिटरसह रूग्णाची लूट करीत आहे. पीडित रूग्णांनी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा आणि बिल तपासून घेण्याचे आवाहन संदीप जोशी यांनी केले आहे.
आनंद 9822204677 , अमेय 9561098052 , शौनक 7447786105 , मनमीत 7744018785
या 4 क्रमांकावर आपली बिले, आपली रसिद, आपली अॅप्लिकेशन पाठवावे. आपण आपल्या समस्या आणाव्यात. लिखित स्वरूपात बिलांसहीत आपण त्याठिकाणी आपली बिले नियमाप्रमाणे करण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले आहेत.