नागपूर - कोरोना संसर्ग काळात प्रशासनाच्या आवाहनानंतर खासगी हॉस्पिटलने केलेले सहकार्य अनमोल आहे. मात्र याच काळात काही असामाजिक तत्वांनी संधीचा फायदा तर घेतला नाही ना? याची तपासणी करा. खासगी हॉस्पिटलमधील तक्रार, आक्षेप असणाऱ्या बिलांचे परीक्षण करण्यासाठी तटस्थ पद्धतीने काम करणाऱ्या वैद्यकीय समितीचे गठन करा. सत्य जनतेपुढे येऊ द्या, असे निर्देश ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज महापालिका आयुक्तांना दिले.
बैठकीत लसीकरणासाठा वाढविण्यासाठी उपाययोजना, लोकसहभाग, यावर चर्चा झाली. ज्यांचा पहिला डोस झाला आहे. त्यांना वेळेत दुसऱ्या डोसचे नियोजन करण्याबाबतच्या सूचना यावेळी पालकमंत्र्यांनी केल्या. तिसरी लाट दारात असून त्यापूर्वी जिल्ह्यातील लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. त्यामुळे लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्याचे निर्देश दिले. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा नसल्याने नागरिक नाराज असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
आक्षेपार्ह बिलांच्या तपासणीसाठी समिती गठीत करा - डॉ. नितीन राऊत - रुग्णालयांची आक्षेपार्ह बिल
कोरोना संसर्ग काळात प्रशासनाच्या आवाहनानंतर खासगी हॉस्पिटलने केलेले सहकार्य अनमोल आहे. मात्र याच काळात काही असामाजिक तत्वांनी संधीचा फायदा तर घेतला नाही ना? याची तपासणी करा. खासगी हॉस्पिटलमधील तक्रार, आक्षेप असणाऱ्या बिलांचे परीक्षण करण्यासाठी तटस्थ पद्धतीने काम करणाऱ्या वैद्यकीय समितीचे गठन करा, असे निर्देश नितीन राऊत यांनी आयुक्तांना दिले.