ETV Bharat / city

बारमध्ये हल्लेखोरांचा राडा; शस्त्रांचा धाक दाखवत लुटले काऊंटर, आरोपी गजाआड - nagpur crime news

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रॉयल बार आणि रेस्टॉरंट आहे. मंगळवारी रात्री बारमध्ये गर्दी होती, त्याचवेळी काही आरोपींनी चाकू, तलवारी आणि धारदार शास्त्रांचा धाक दाखवून बारच्या काऊंटरमधील रक्कम लुटली आहे.

nagpur crime
जरीपटका पोलीस स्टेशन
author img

By

Published : Sep 23, 2020, 6:49 PM IST

नागपूर - नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत रॉयल बीयर बारमध्ये मंगळवारी रात्री पाच हल्लेखोरांनी हातात चाकू, गुप्ती आणि इतर धारदार शस्त्र घेऊन हल्ला केला होता. कॅश काऊंटरवर बसलेल्या बार मॅनेजर आणि शेजारीच उभ्या असलेल्या व्यक्तीला चाकूचा धाक दाखवत, या हल्लेखोरांनी कॅश काऊंटरमधील सर्व रक्कम लुटून नेल्याची घटना घडली आहे. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. त्याच्याआधारे पोलिसांनी सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

शस्त्रांचा धाक दाखवून बीयर बार लुटला

जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रॉयल बार आणि रेस्टॉरंट आहे. मंगळवारी रात्री बारमध्ये गर्दी होती, त्याचवेळी काही आरोपींनी चाकू, तलवारी आणि धारदार शास्त्रांचा धाक दाखवून बारच्या काऊंटरमधील रक्कम लुटल्याची माहिती पोलिसांना समजली. यानंतर लगेचच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, हल्लेखोर बारच्या बाहेर पळून गेले होते.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्या भागात लगेच नाकाबंदी करून त्यांचा परिसरात रात्रभर शोध घेतला होता. मात्र, हल्लेखोर परिसराच्या बाहेर पळून गेले होते. आज पहाटे पोलिसांनी त्यांना नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा परिसरात ते लपलेल्या ठिकाणावरून ताब्यात घेतले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.