ETV Bharat / city

कोरोना उपाययोजनेसाठी नागपुरात कोट्यवधींचा खर्च; फक्त जेवणावर झाला 'एवढा' खर्च... - nagpur corona expenses

गेल्या तीन महिन्यांपासून विलगीकरण कक्षेत ठेवण्यात आलेल्या रुग्णांसाठी महानगर पालिकेकडून फक्त जेवणावर तब्बल ८५ लाख रुपये खर्च केल्याची माहीती पुढे आली आहे. शिवाय आतापर्यंत प्रत्येक दिवसासाठी हा खर्च ८८ हजाराच्या घरात असल्याचे समोर आले आहे. याशिवाय कोरोनावरील खर्चासाठीचे अनेक थक्क करणारे आकडे समोर आले आहेत.

अभय कोलारकर
अभय कोलारकर
author img

By

Published : Aug 8, 2020, 5:06 PM IST

नागपूर - गेल्या काही महिन्यांपासून नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच आतापर्यंत विविध विलगीकरण कक्षात असणाऱ्या रूग्णांच्या जेवणावर तब्बल ८५ लाख रूपये खर्च झाल्याची माहीती पुढे आली आहे. नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाकडे ही माहिती मागितली होती. यात ही आकडेवारी समोर आली आहे.

अभय कोलारकर यांची प्रतिक्रिया

शहरातील कोरोना रुग्णांचा वाढता आकडा थक्क करणारा आहे. दररोज अनेक रुग्णांची नोंद होत आहे. अशातच गेल्या तीन महिन्यांपासून विलगीकरण कक्षेत ठेवण्यात आलेल्या रुग्णांसाठी महानगर पालिकेकडून फक्त जेवणावर तब्बल ८५ लाख रुपये खर्च केल्याची माहिती पुढे आली आहे. शिवाय आतापर्यंत प्रत्येक दिवसासाठी हा खर्च ८८ हजाराच्या घरात असल्याचे समोर आले आहे. नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मनपाच्या आरोग्य विभागाकडे माहिती अधिकारच्या माध्यमातून ही माहिती मागीतली होती. विशेष म्हणजे १ मे पासून विलगीकरणातील रुग्णांची संख्या लक्षात घेता आणि रुग्णांच्या दोन वेळचे जेवण विचारात घेता. ही आकडेवारी संभ्रमित करणारी असल्याचे अभय कोलारकर यांनी सांगितले.

हेही वाचा - वीज केंद्रात जमिनी गेल्या अन् नशिबी आला संघर्ष; अखेर प्रकल्पग्रस्तांचा सामूहिक आत्महत्येचा इशारा

२५ मार्च ते ३० जून या कालावधीत महानगरपालिकेला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ५ कोटी २८ लाख प्राप्त झाले. मात्र, प्रत्यक्षात २ कोटी ७ लाख ९३ हजार ३५६ रुपये इतकेच प्रत्यक्षात खर्च झाल्याचे या माहितीतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे इतका खर्च करूनही शहरातील रुग्णसंख्या नियंत्रणात का नाही? असा सवालही यावेळी कोलारकर यांनी उपस्थित केला आहे. शिवाय विलगीकरण कक्षेतील रुग्णांवर झालेला इतका खर्च खरचं झालायं का? हे देखील संभ्रमीत करणारे असल्याचे अभय कोलारकर यांनी सांगितले. शिवाय हा निधी महाराष्ट्र शासनाकडून महानगरपालिकेला मिळाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेला स्वतःच्या निधीत देखील वाढ करणे गरजेचे असल्याचे कोलारकर यांनी सांगितले.

हेही वाचा - जामीन मंजूर...जे घाबरलेत त्यांना आणखी घाबरवणार; मनसे नेते जाधव यांची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.