ETV Bharat / city

Eknath Shinde Supporter Expulsion : एकनाथ शिंदे समर्थक किरण पांडव यांची शिवसेनेतून हकालपट्टी - किरण पांडव

नागपुरातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांचे कट्टर समर्थक किरण पांडव ( Kiran Pandav ) यांची शिवसेनेने पक्षातून हकालपट्टी ( Expulsion from Shiv Sena ) करण्यात आली आहे. शिवसेनेला खिंडार पडणारे एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांवर आता शिवसेनेने कारवाई करण्यात सुरवात केली आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात आरोपप्रत्याप पहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

Eknath Shinde Supporter Expulsion
किरण पांडव यांची शिवसेनेतून हकालपट्टी
author img

By

Published : Jul 6, 2022, 6:18 PM IST

नागपूर - राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नागपुरातील कट्टर समर्थक किरण पांडव ( Eknath Shinde supporter Kiran Pandav ) यांची शिवसेनेने पक्षातून हकालपट्टी ( Expulsion from Shiv Sena party ) करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेला खिंडार पडणारे एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांवर आता शिवसेनेने कारवाई ( Shiv Sena In Action Mode ) करण्यात सुरवात केली आहे असे चित्र सध्या तयार झाले आहे. एकनाथ शिंदे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना किरण पांडव हे गडचिरोलीचे समन्वयक होते.

एकनाथ शिंदे समर्थकांची हकालपट्टी - एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर किरण पांडव यांनी एकनाथ शिंदे यांच्या विजयाचा नागपूर शहरात जल्लोष साजरा केला होता. अनेक ठिकाणी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्याच्या शुभेछया देणारे होर्डिंग्स व बॅनर्स लावले होते. यापूर्वी किरण पांडव यांनी काटोल व दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली होती. परंतु त्या दोन्हीही निवडणुकीत पांडव पराभूत झाले होते. शिवसेनेच्या मुंबईतील केंद्रीय कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकारद्वारे किरण पांडव यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

राजकीय वातावरण चिघळण्याची शक्यता - एकनाथ शिंदे यांचे नागपुरातील कट्टर समर्थक किरण पांडव यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर राजकीय वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटात आरोपप्रत्याप पहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.

हेही वाचा - Nashik School Wari : 400 विद्यार्थी, शिक्षकांचा वारी सोहळा; शाळेला पंढरपूरची अनुभूती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.