नागपूर - जमावबंदीत बाहेर पडल्याने आठ विदेशी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती म्यानमारचे असून ते तबलिगीच्या संपर्कात आले होते, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र त्यांनी दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकजच्या कार्यक्रमात हजेरी लावली नव्हती.
शहरात जमावबंदी असताना देखील ते गिट्टी खदान भागात होते. त्यानंतर संबंधितांनी तहसील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मशीदीत आश्रय घेतला. जमावबंदी असताना देखील धार्मिक स्थळाच्या ठिकाणी हे आठजण थांबल्याने नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सध्या त्यांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती तहसील पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयेश भांडारकर यांनी दिली आहे.