नागपूर - जिल्हापरिषद आणि पंचायत समितीची पोट निवडणूक ५ ऑक्टोबरला होऊ घातली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला जोरदार सुरुवात केली आहे. एकीकडे महाविकास आघाडीतील तीनही पक्ष भारतीय जनता पक्षाला कडवी झुंज देणार असे वातावरण आहेत. तर, दुसरीकडे आघाडीत बिघाडी समोर येत आहे. रामटेक मतदार संघाचे शिवसेनेना प्राणित अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी भर सभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर खालच्या भाषेत टीका केली आहे. ठाकरे सरकारने यांना सामिल करुण घेतले. अन्यथा, यांना कुत्र विचारत नव्हत अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली आहे. रामटेक सर्कलमध्ये शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असता जयस्वाल बोलत होते.
'महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी यांना कोणी कुत्र विचारत नव्हते'
महाविकास आघाडीतील दोन्ही पक्ष कोणत्या तोंडाने मतं मागायला गावांमध्ये फिरत आहेत असा प्रश्न उपस्थित करून जयस्वाल यांनी काँग्रेससह राष्ट्रवादीवर सरसंधान साधले आहे. गेल्या निवडणुकीत तुम्हाला कोणी विचारत नव्हते. तेव्हा शिवसेना प्रमुख आणि वर्तमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला सरकारमध्ये घेतले त्यामुळे काँग्रेसचे लोक आता जिवंत झाले. त्यावेळी या दोन्ही पक्षांना गळती लागली होती असही जयस्वाल यावेळी म्हणाले आहेत. दरम्यान, त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर जोरदार वायरल होत आहे. महाविकास आघाडी स्थापन होण्यापूर्वी यांना कोणी कुत्र विचारत नव्हते आणि आता तुम्हीच लोक जिथे शिवसेनेचा मतदारसंघ आहे त्या गावांमध्ये जाऊन मतं मागत आहात अशी घणाघाती टीका आमदार आशीष जयस्वाल यांनी केली आहे
'हिशोब चुकता करणार'
रामटेक हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. शिवसेना महायुतीमध्ये असताना रामटेक लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे खासदार निवडणूक आले आहेत. तर विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी भाजप उमेदवाराला पराभूत केले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकिय समीकरण बदलले आहेत. त्यामुळे आता काँग्रेससह राष्ट्रवादी पक्षाचे नेतेही रामटेक भागात सभा घेऊन मतं मागत आहेत. त्यामुळे आशिष जयस्वाल यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीका केली आहे.