ETV Bharat / city

नागपुरात मोठी कारवाई : इव्हेंटच्या नावाखाली तरुणींकडून अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Drug smuggling gang busted in nagpur

इव्हेंटच्या नावाखाली तरुणींकडून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला यश मिळाले ( Drug smuggling gang busted ) आहे. पोलिसांनी टोळीचा मुख्य सूत्रधार अभिषेक पांडे आणि सोनू ठाकूर या दोघांना अटक केली आहे. हे दोघे नागपुरात काही तरुणींना केटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली ओडिसाला नेऊन तिथून त्यांच्यामार्फत अमली पदार्थाची तस्करी करायचे.

Drug smuggling gang busted in nagpur
नागपुरात मोठी कारवाई
author img

By

Published : Apr 5, 2022, 1:40 PM IST

नागपूर - इव्हेंटच्या नावाखाली तरुणींकडून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला यश ( Drug smuggling gang busted in nagpur ) मिळाले आहे. पोलिसांनी टोळीचा मुख्य सूत्रधार अभिषेक पांडे आणि सोनू ठाकूर या दोघांना अटक केली आहे. हे दोघे नागपुरात काही तरुणींना केटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंटच्या नावाखाली ओडिसाला नेऊन तिथून त्यांच्यामार्फत अमली पदार्थाची तस्करी करायचे.

मुलींचा वापर अंमली पदार्थ तस्करी शारीरिक शोषणासाठी वापर - काही दिवसांपूर्वी अभिषेक पांडे आणि दत्तू नावाच्या दोन गुन्हेगारा एकमेकांना फोनवरून धमकावण्याचा ऑडिओ रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती लागली होती. त्यावरुन हे दोन्ही आरोपी तरुणींना ओडिशाला नेऊन त्यांच्यामार्फत अमली पदार्थाची तस्करी करत असल्याचा खुलासा केला. आतापर्यंत एकूण सहा तरुणींना या टोळीने अशा पद्धतीने अमली पदार्थाच्या तस्करीसाठी तसेच त्यांचा शारीरिक शोषण करण्यासाठी वापरल्याचे उघड झाले आहे.

आणखी धक्कादायक खुलासे - ऑडिओ क्लिपचा अभ्यास केल्यानंतर काही धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. नागपुरातील काही सराईत गुन्हेगारांनी अभिषेक पांडे सोबत नेहमी ओडिशा मधून अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तरुणींना एका हॉटेल मध्ये नेऊन त्यांचे लैंगिक छळ (बलात्कार)केल्याचे, आणि त्यांना मारहाण ही केल्याचे त्याच ऑडिओ क्लिप मधून समोर आलंय. पोलिसांनी याप्रकरणी अभिषेक पांडे व सोनू ठाकूर या दोघांना अटक केली असून हॉटेल मध्ये तरुणींचे लैंगिक छळ करणारे इतर सर्व फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

हेही वाचा - Use of horses for farming : बैलचं नाही मिळाले! मग काय?, घोडेचं जुंपले औताला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.