ETV Bharat / city

योग्य काळजी घेतल्यास म्युकरमायकोसिसला दूर ठेवता येते - डॉ. प्रशांत निखाडे

author img

By

Published : May 23, 2021, 7:10 AM IST

या आजाराची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपायांबद्दल नागरिकांना वैद्यकीय तज्ज्ञांकडून सल्ला आणि मार्गदर्शन सुरू करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर विदर्भ कान-नाक-घसा संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे यांनी या जनजागृतीच्या मोहिमेत सहभाग घेत नागरिकांना या आजाराबाबत मार्गदर्शन केले आहे.

म्युकरमायकोसिसला दूर ठेवता येते - डॉ. प्रशांत निखाडे

नागपूर - काळ्या बुरशीमुळे होणारा आजार म्हणजेच म्युकरमायकोसिस हा सध्या जीवघेणा झाला आहे. कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांमध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढत आहे. मात्र, आपण या बुरशीजन्य संसर्गाला सहजपणे दूर ठेवू शकतो. रक्तातील साखरेचे योग्य व्यवस्थापन आणि योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास म्युकरमायकोसिस हा आजारही बरा होऊ शकतो. तसेच कोरोनातून बरे झालेल्या रुग्णाने विशेष काळजी घेतल्यास या आजाराला स्वत:पासून दूर ठेवणे शक्य असल्याची माहिती विदर्भ ईएनटीसी संघटनेचे अध्यक्ष तथा टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे यांनी दिली.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने म्युकर मायकोसिस संदर्भात काळजी घेण्याचे आवाहन करत लोकजागृती अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या आजाराची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपायांबद्दल नागरिकांना वैद्यकीय तज्ज्ञांकडून सल्ला आणि मार्गदर्शन सुरू करण्यात आले आहे. त्यापार्श्वभूमीवर विदर्भ कान-नाक-घसा संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे यांनी या जनजागृतीच्या मोहिमेत सहभाग घेत नागरिकांना या आजाराबाबत मार्गदर्शन केले आहे. यानंतर त्यांनी म्युकरमायोसिस आजारासंदर्भात नेमण्यात आलेल्या टास्कफोर्सच्या सदस्यांची बैठक घेऊन आढावाही जाणून घेतला आहे.

आजार संसर्गजन्य नाही, पण वातावरणातून होतो

म्युकरमायकोसिस हा संसर्गजन्य आजार नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. हा रोग वातावरणातून शरीरात येतो. मधुमेह असलेल्या किंवा कोरोनाच्या उपचारादरम्यान मधुमेह झाला, किंवा व्याधीग्रस्त आजार असलेल्या रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य संसर्गाचा शरीराच्या तीन भागामध्ये परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामध्ये जबडा, डोळे आणि शेवटी मेंदूमध्ये याचा परिणाम आढळून येतो. यात दात हे प्रथम लक्ष्य असते. दातांना यामुळे प्रचंड वेदना होऊ शकतात, अशी माहिती डॉ. निखाडे यांनी यावेळी दिली.

म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाल्यास नाक बंद होते. तो सायनसमध्ये जास्त पसरल्यास डोळ्याने अंधुक दिसू लागते. त्यानंतर याचा संसर्ग मेंदूमध्ये झाल्यास फिट् सुद्धा येऊ शकतात. काळ्या बुरशीला आवर घालण्यासाठी दररोज रुग्णांच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणाची तपासणी करून घेणे फायद्याचे ठरू शकते. तसेच कोरोना झाल्यानंतर किंवा म्युकर मायकोसिसची लक्षणे आढळल्यानंतर उपाचाराअंती रुग्णाने आहाराच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमित संतुलित आहाराचे सेवन केल्यास आणि प्रतिंबधात्मक उपाययोजनांचे पालन केल्यास आपण या बुरशीजन्य संसर्गाला दूर ठेऊ शकतो. याचबरोबर मातीकाम करणाऱ्या शेतकऱ्यांना या बुरशीचा धोका जास्त आहे. त्यामुळे पावसाळ्यात शेतात काम करताना शेतकऱ्यांनी मास्क, हातमोजे घालणे गरजेचे असल्याचे मत डॉ. निखाडे यांनी नमूद केले आहे.

एम्फोटेरेसीन बी औषध वितरणासाठी समिती -

नागपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसची रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातुलनेत उपारासाठी आवश्यक असलेलल्या एम्फोटेरेसीन बी या इंजेक्शनची मागणी जास्त आणि पुरवठा कमी आहे. त्यामुळे याचा काळा बाजार सुरू होण्याची शंका आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यलयात टास्क फोर्सची बैठक पार पडली. या बैठकीत एम्फोटेरेसीन बी या इंजेक्शनच्या वितरणासंदर्भात म्युकरमायकोसिस टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. प्रशांत निखाडे यांच्या नेतृत्वात आणखी एक समिती नियुक्त करण्यात आली. ही समिती या औषधा वितरण संबंधात महत्वाची भूमिका घेणार आहे. यात काही सूचना करण्यात आल्या असून यावर लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. आता एम्फोटेरेसीन-बी हे इंजेक्शन प्रशासनाच्या अंतर्गत असलेल्या या समितीच्या माध्यमातून वितरीत केले जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.