ETV Bharat / city

World Cancer Day 2022 : घाबरू नका, योग्य उपचाराने बरा होतो कॅन्सर - जागतिक कॅन्सर दिन

सध्या कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा भयावह आजार मानला जातो. तरी त्यास घाबरण्याचे काही कारण नाही. योग्य उपचार केल्यास कॅन्सर वर मात करता ( Proper Treatment Can cure Cancer ) येते.

World Cancer Day 2022
World Cancer Day 2022
author img

By

Published : Feb 4, 2022, 7:15 AM IST

Updated : Feb 4, 2022, 9:27 AM IST

नागपूर - आजच्या घडीला कॅन्सर म्हणजेच कर्करोग हा भयावह आजार मानला जातो. तरी त्याला घाबरण्याचे काही कारण नसून योग्य उपचार केल्यास कॅन्सर बरा होऊ ( Proper Treatment Can cure Cancer ) शकतो. नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रिजनल कॅन्सर हॉस्पिटलचे ( Rashtrasant Tukadoji Maharaj Cancer Hospital ) प्रमुख डॉ. बी केशर्मा सांगतात की, विदर्भात तंबाखूच्या सेवनामुळे सर्वाधिक रुग्ण हे ओरल कॅन्सर म्हणजेच मुख कर्करोगाचे असल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. पण ते रुग्णही योग्य उपचारानंतर बरे होत आहे. वेळीच लक्षणे ओळखुन कॅन्सरला कसा आळा घातला जाऊ शकतो जाणून घेऊ 'जागतिक कॅन्सर दिनी'या ( World Cancer Day 2022 ) विशेष रिपोर्ट मधून.

दरवर्षी वाढत्या कॅन्सर रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी युनियन फॉर इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोल ( Union for International Cancer Control ) द्वारा जागतिक कॅन्सर दिन ( World Cancer Day 2022 ) साजरा करून जनजागृती केली जाते. यामध्ये दरवर्षी एक थीम ठरवली जात असून यंदा 'क्लोज द केअर गॅप' यावर भर दिला जाणार आहे. उपचार करतांना अधिकाअधिक काळजी घेऊन कॅन्सर रुग्णांना बरे करण्याचे आवाहन युआयसीसीच्या माध्यमातून केले जात आहे. 2020 मध्ये 18.1 लाख कॅन्सरची प्रकरण समोर आली होते. यातील 9.3 लाख पुरुषांना तर 8.8 लाख महिलांना कॅन्सरने झाल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. 21 व्या शतकात शारीरिक स्वास्थामध्ये कॅन्सर म्हणजेच कर्करोग हे मोठे आवाहन वैद्यकीय क्षेत्रासमोर उभे ठाकले आहे. कॅन्सरचे साधारणपणे चार टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात कॅन्सरचे निदान झाल्यास त्याला वेळीच औषध उपचार करून बरे करणे शक्य होत आहे. यात विदर्भात सर्वाधिक रुग्णांमध्ये तोंडाच्या कॅन्सरचे रुग्ण मिळत असून, त्याचे प्रमाण 35 टक्के इतके आहे. त्यानंतर महिलांमध्ये 28 टक्के रुग्ण हे स्तन कॅन्सर आणि 26 टक्के गर्भाशयाचे मुखाचे कॅन्सर असल्याचे समोर येत आहे.

पहिल्या स्टेजवर कॅन्सर कसा ओळखावा

मुखाच्या कॅन्सरचे लक्षण असल्यास जेवताना त्रास होतो, तोंडात फोड होऊन त्यामध्ये रक्तस्त्राव होणे, गिळताना गळ्यात त्रास होणे, आवाजात दोन तीन महिन्यांपासून बदल वाटत असल्यास त्वरित वैद्यकीय सल्ला घ्यावा. बहुतांश टेस्ट या अगदी 300 ते 700 रुपयांपर्यंत होत असतात. महिलांना स्तनाच्या कॅन्सरची लक्षण असल्यास रक्तस्त्राव होणे, उशिरा बाळंतपण, ब्रेस्टच्या आजुबाजूला गाठी येतात. त्यामुळे लक्षणांना सामान्य न समजताच ठराविक वेळानंतर चाचणी करून कॅन्सर आहे किंवा नाही हे सहज माहिती करून उपचार करणे सोपे ठरू शकते. वेळीच निदान झाल्यास त्वरित उपचार, ज्यामध्ये किमो, अद्यावत तंत्रज्ञान आणि औषधांच्या साह्याने कॅन्सरवर मात करता येते.

दुर्लक्ष झाल्यास रुग्णांच्या उपचारात अडचण

पूर्वी जनजागृती नसल्याने अनेकदा रुग्ण हे शेवटच्या टप्प्यात कॅन्सरच्या उपचारासाठी रुग्णालयात पोहोचत होते. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करताना अडचणीचे ठरत होते. पण, मागील काही काळात झालेल्या जनजागृतीने तसेच रुग्णालयाच्या वतीने सुद्धा गाव पातळीवर होत असलेल्या शिबिरांच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त रुग्णांना वेळीच ओळखून उपचार होत आहे. त्यामुळे रुग्ण बरे होण्याची संख्या वाढलेली आहे.

अनेक रुग्णांना उपचारात होत आहे फायदा

नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटलमध्ये केवळ विदर्भातून नाही तर लगतच्या छत्तीसगड, मध्यप्रदेशमधून सुद्धा रुग्ण उपचारासाठी येतात. गेल्या 48 वर्षांपासून कॅन्सरग्रस्त रुग्णांना सेवा देत, त्यांच्यावर उपचार करण्याचे काम तज्ञ वैद्यकीय मंडळींकडून अविरतपणे सुरु आहे. यामध्ये 2018 ते 2020 या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये 14 हजार 439 रुग्णांची नोंद राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रिजनल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ( World Cancer Day 2022 ) झालेली. त्यातील 33 टक्के रुग्ण म्हणजेच 8789 केसेस भयावह तोंडाच्या कॅन्सरचे होते. त्याच्या खालोखाल ब्रेस्ट कॅन्सर आणि गर्भाशयाचे कॅन्सरचे रुग्ण समोर आले आहे.

पूर्वी बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण पूर्वी केवळ 2 टक्के इतके होते. ते वाढून आजच्या घडीला साधारण 17 ते 18 टक्के पोहचले आहे, असल्याचे डॉ. बी के. शर्मा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. त्यामुळे हा कॅन्सर वेळीच निदान झाल्यास बरा होतो हे सांगण्यासाठी जनजागृती होणे गरजेचे आहे. लोकांनी सौम्य लक्षणांकडे कानाडोळा न करता आणि स्मोकिंग आणि तंबाखू सेवन टाळून देखील आपले आयुष्य निरोगी जगू शकतात, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाकडून केले जात आहे.

हेही वाचा - Pune Building Collapse : जेसीबीच्या धक्क्यामुळे दुर्घटना घडली असावी; कामगाराची माहिती

Last Updated : Feb 4, 2022, 9:27 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.