नागपूर - एकाच कुटुंबातील पाच सदस्यांची हत्या करून, आरोपीने स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २० जून रोजी तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या टिमकी परिसरात घडली होती. या घटनेने संपूर्ण नागपूर शहर हादरले होते. या घटनेचा तपास करताना पोलिसांना अनेक धक्कादायक पुरावे हाती लागले आहेत. ज्यातून आरोपी आलोक आणि त्याची मेहूणी अमिषा यांच्यात अनैतिक संबंध होते, हे आता स्पष्ट झाले आहे. मात्र, पोलिसांना तपासादरम्यान आणखी काही गोष्टी खटकत असल्याने सर्व मृतकांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे.
सर्व मृतकांची डीएनए चाचणी होणार -
पोलिसांनी सर्व 6 मृतकांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला आहे. आरोपीने हे हत्याकांड घडवताना कुठे क्रूरता, तर कुठे मवाळ भूमिका घेतली होती. यावरून पोलिसांना तपासात काही बाबी खटकायला लागल्या आहेत. त्याचे उत्तर शोधण्यासाठी सर्व मृतकांची डीएनए चाचणी केली जाईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मेहूणी निर्घृणपणे केली होती हत्या -
आरोपी आलोक माटूरकर याने सर्वात निर्घृणपणे मेहूणी अमिषा बोबडे हिची हत्या केली होती. मात्र तिची हत्या करण्यापूर्वी त्याने मेहूणीसोबत शारीरिक संबंध प्रस्तापित केले होते. त्यानंतर झालेल्या वादातून त्याने मेहूणीची गळा चिरून हत्या केली. तो एवढ्यावर न थांबता त्याने तिच्या शरीरावरील प्रायव्हेट पार्टदेखील कापला होता. तर कोणतीही ईजा न करता त्याने मुलाचा श्वास उशीने कोंडून त्याची हत्या केली.
आलोकच्या वागण्यात आली होती विकृती -
पोलिसांनी दोन्ही घटनास्थळावरून चार मोबाईल जप्त केले आहेत. ज्यामध्ये आरोपी आलोकने हे भयानक कृत्य करण्यापूर्वी अनेक वेळा यूट्यूबसह इंटरनेटवर क्राईम शो बघितले होते. त्यानंतर त्याच्या वागण्यात फरक दिसून येत होता. एखाद्या विकृत व्यक्तीप्रमाणे त्याचे वागणे सुरू होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर अमिषाच्या मोबाईलमध्ये त्या घटनाक्रमाचे संपूर्ण ऑडिओ रेकॉर्डिंग झाले आहे. ज्याच्या आधारे पोलिसांचा तपास या निष्कर्षांपर्यंत पोहोचला आहे.
हेही वाचा - राज्याला तिसऱ्या लाटेचा धोका; घाईघाईने निर्बंध शिथिल करू नका - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे