ETV Bharat / city

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा रद्द, जिल्हा प्रशासनाचा निर्णय - Deekshabhoomi

नागपूर - आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे दरवर्षी दसर्‍याला दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन या वर्षी करता येणार नसल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा रद्द, जिल्हा प्रशासनाचा निर्णय

author img

By

Published : Oct 3, 2021, 1:24 PM IST

नागपूर - राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे दरवर्षी दसर्‍याला दीक्षाभूमीवर आयोजित होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्याचे आयोजन या वर्षी करता येणार नसल्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

३० सप्टेंबरला झाली बैठक

राज्य शासनाने (24 सप्टेंबर)रोजी निर्गमित केलेल्या धार्मिक स्थळे सुरू करण्याबाबतच्या आदेशानुसार मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांना प्रतिबंधीत केले आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने नागपूर दीक्षाभूमीवर आयोजन करणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव तसेच ड्रॅगन पॅलेस टेम्पल कामठी अध्यक्षांशी ३० सप्टेंबरला बैठक घेतली. राज्य शासनाच्या दिशा निर्देशानुसार मोठ्या प्रमाणात गर्दी टाळण्याबाबतची सूचनाही त्यांनी यावेळी केली आहे.

धार्मिक स्थळे सुरू,मात्र गर्दीचे कार्यक्रम रद्द

राज्य शासनाने निर्गमित केलेल्या आदेशानुसार राज्यातील धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र मोठ्या संख्येने भाविक एकत्रित येण्याच्या कार्यक्रमांना प्रतिबंधित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने दीक्षाभूमी येथे 15 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात येणाऱ्या अनुयायांची संख्या लाखोमध्ये असून या ठिकाणी राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे कोवीड- १९चा प्रोटोकॉल पाळणे, राज्य शासनाचे उपरोक्त निर्देश पाळणे शक्य नसल्याने हा अभिवादन सोहळा रद्द करण्यात आला आहे.

हेही वाचा - पारंपरिक येरले पद्धतीने मूर्ती झाकून अंबाबाईच्या गाभाऱ्याची स्वच्छता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.