नागपूर - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Opposition Leader Devendra Fadnavis ) हे नागपूर विमानतळावर माध्यमांशी संवाद साधत ( BJP Leader Devendra Fadnavis at Nagpur Airport ) होते. यावेळी त्यांनी असे सांगितले की, राज्यपालांना महाविकास आघाडी सरकार कडून टार्गेट केल्या जात आहे. जाणीवपूर्वक घटना बाह्य कृती करायची आणि त्यानंतर राज्यपाल यांच्या विरोधात बोलायचे. अश्या पद्धतीने कोणालाही टार्गेट करणे हे चुकीचे आहे. ( Devendra Fadnavis About Governor )
'राज्यपालांना टार्गेट करणे चुकीचे'
फडणवीस म्हणाले, मला असे वाटते की जाणीवपूर्वक घटना बाह्य कृती करायची आणि त्यानंतर राज्यपाल यांच्या विरोधात बोलायचे. हे एक प्रकाराने विरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. राज्यपाल हे घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती आहे. ते घटनेप्रमाणे काम करतात. त्यांना प्रकारे टार्गेट करणे चुकीचे आहे असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. यावेळी राज्यपालांवर होत असलेलता टिकेला त्यांनी उत्तर दिले. ते नागपूरात माध्यमांशी बोलत होते.
'हे ऐकून माझे मनोरंजन होत आहे'
फोन टॅपिंग प्रकरणात आरोप होत आहेत असा प्रश्न माध्यमांनी केला होता यावर बोलतांना ते म्हणाले की, हे ऐकून माझे मनोरंजन होत आहे.
हेही वाचा - Sanjay Raut On Phone Taping Case : 'गोव्यातही शांतता! फोन टॅपिंग सुरु आहे'