नागपूर - तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकला निओ मेट्रोची भेट दिली होती. परंतु, मेट्रो व्यवहार्य नसल्याचे कारण सांगून सरकार मेट्रो प्रकल्पाला स्थगिती देण्याच्या तयारीत असल्याचा आरोप भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी केला आहे. वाढलेल्या वाहतुकीमुळे शहराला मेट्रोची नितांत गरज असताना देखील हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
निओ मेट्रोसाठी डीपीआर देखील तयार झाला आहे. मात्र, मंत्री छगन भुजबळ यांनी प्रकल्प व्यवहार्य नसल्याचे सांगितले. यामुळे सरकार विकासाच्या विरोधात असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. मंत्रिमंडळात एकाही महिला मंत्र्याला स्थान न दिल्याने हा राज्यातील 6 कोटी महिलांचा अपमान असल्याचे आमदार फरांदे म्हणाल्या.