नागपुर - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीवर विनाशकालेय विपरीत बुद्धी अशा शब्दात टीका केली. त्याला आदित्य ठाकरे उत्तर बोलतांना म्हणाले, की शिवसेना पक्षाने भूमिका सोडलेली नाही. शिवसेनेची भूमिका ही कायम स्पष्टच आहे. Aditya Thackeray's reaction on Dussehra gathering ज्यांना ज्यांना आमची मते व भूमिका आमचे हिंदुत्व मान्य असेल ते सोबत येतील. गेल्या अडीच वर्ष महविकास आघाडी सरकार असताना आम्ही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी प्रयत्न केल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
बैल पोळ्यात 50 खोके एकदम ओके कोणाच्या निमित्ताने ठिकठिकाणी बैल सजावट करताना 50 खोके एकदम ओके अशा पद्धतीचे स्लोगन लिहिल्या गेल्याच पाहायला मिळालं हे जनतेतून आलेले आहे. Aditya Thackeray's reaction त्यांना आम्ही सांगितलेलं नाही अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे युवा सेना प्रमुख यांनी दिली. सर्वाना माहित झालं आहे, खोके काय असतात ते. या सगळ्या मागे कोण आहे. हे लोकांसमोर आले पाहिजे.
हे लोकांसमोर येणे गरजेचे राज्यभर फिरून पक्ष बांधणी करत आहे. यापूर्वी असं व्हायचे की त्यांना मातोश्रीपर्यंत पोचू दिले जात नव्हते. पण आता एक पक्षाच्या कार्यकर्त्यासाठी मोठी संधी आहे. वारेगाव येथे चुकीच्या पद्धतीने एशबंड केली जात होती. ती जानेवारी महिन्यात केलेल्या कारवाईनंतर थांबवण्यात आलेली आहे. नवीन सरकार आल्यानंतर त्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालेले आहे. वारेगाव, नांदगावसह अनेक ठिकाणी अश्या पद्धतीचे प्रश्न आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात फ्लाय एशमुळे होत असतांना दुर्लक्ष होत असल्याने या मागे कोण आहे. हे लोकांसमोर येणे गरजेचे असल्याचे म्हणत सूचक वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले.
जीवनाची राखरांगोळी झाली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याचा जिल्ह्यातील हा प्रश्न असल्याने त्यांची पुढल्या आठवड्यात वेळ मागणार आहे. तसेच गावकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा अशाच पद्धतीने सुरू राहील. कारण हा कुठल्या राजकीय पक्षाचा नसून हा सर्वसामान्य नागरिकांचा त्यांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. स्थानिक गावकऱ्यांचे जीवनाची राख रांगोळी झाली आहे. त्यामुळे सगळ बदलण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचं ही आदित्य ठाकरे बोलताना म्हणाले.
हेही वाचा - Sonali Phogat Murder Case सोनाली फोगट खून प्रकरणी आणखी दोघांना अटक, ड्रगचा झाला खुलासा