ETV Bharat / city

Cryogenic Engine Testing : रॉकेट लॉचिंग होणार 40 टक्क्यांनी स्वस्त; नागपुरात पार पडली चाचणी - Liquid natural gas

हैदराबादच्या स्कायरूट एअरोस्पेस कंपनीने ‘मेड इन इंडिया’ क्रायोजेनिक रॉकेट इंजिन विकसित केले. यामध्ये लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजेच एलएनजी गॅसचा वापर करण्यात आला आहे. भारतीय कंपनीच्या या यशामुळे अंतराळविज्ञान क्षेत्रात मोठे क्रांतीकारी बदल होण्याची आशा वर्तवली जात आहे. रॉकेट इंजिनच्या तंत्रज्ञानात अमेरिका, रशिया, चीन, जपानच्या मोजक्या अंतराळ संस्थांनी वर्चस्व प्रस्थापित केले असताना भारतीय कंपनीने मिळवलेले हे यश मोठे यश मानले जात आहे.

Cryogenic Engine Testing
क्रायोजेनीक इंजिनची यशस्वी चाचणी
author img

By

Published : Nov 27, 2021, 7:27 AM IST

नागपूर - भारतासाठी आनंदाची आणि अंतराळ क्षेत्रात ( Space Area )मोठी भरारी घेणारी ही बातमी आहे. हैदराबादच्या स्कायरूट एरोस्पेस ( Skyroot Aerospace ) या भारतीय कंपनीने पहिले क्रायोजेनीक इंजिनची यशस्वी चाचणी ( Cryogenic Engine Testing ) 25 नोव्हेंबरला घेतली. विशेष म्हणजे नागपूरच्या सोलार कंपनीच्या ( Solar Company ) सहकाऱ्याने प्राथमिक पासून अंतिम टप्पा गाठेपर्यंत महत्वाच्या चाचण्या पार पाडल्या आहेत. धवन 1 ( Dhawan 1 )असे या क्रायोजेनिक इंजिनला नाव देण्यात आले असून यासाठी मोठे परिश्रम घेतले आहे. आता अंतराळात रॉकेट सोडताना लागणाऱ्या खर्चावर 40 टक्क्यांपर्यंत बचत होणार आहे.

रॉकेट लॉचिंग होणार 40 टक्क्यांनी स्वस्त

हैदराबादच्या स्कायरूट एअरोस्पेस कंपनीने ‘मेड इन इंडिया’ क्रायोजेनिक रॉकेट इंजिन विकसित केले. यामध्ये लिक्विफाईड नॅचरल गॅस म्हणजेच एलएनजी गॅसचा वापर करण्यात आला आहे. भारतीय कंपनीच्या या यशामुळे अंतराळविज्ञान क्षेत्रात मोठे क्रांतीकारी बदल होण्याची आशा वर्तवली जात आहे. रॉकेट इंजिनच्या तंत्रज्ञानात अमेरिका, रशिया, चीन, जपानच्या मोजक्या अंतराळ संस्थांनी वर्चस्व प्रस्थापित केले असताना भारतीय कंपनीने मिळवलेले हे यश मोठे यश मानले जात आहे.

Skyroot Aerospace
स्कायरूट एरोस्पेस

स्वस्त आणि पर्यावरणासाठी मस्त -

इंजिनमध्ये इंधनाचा वापर म्हणून एलएनजी म्हणजेच लिक्विड नॅचरल गॅसचा ( Liquid Natural Gas ) वापर करण्यात आल्यामुळे भविष्यात रॉकेटची उडान ही पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा कमी नुकसान करणारी असणार आहे. त्यामुळे पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळले जाणार असून लागणारा खर्च कमी होणार त्यामुळे आर्थिक फायदाही मोठा होणार आहे.

Cryogenic Engine Testing
नागपुरात पार पडली चाचणी

नागपूरात पार पडले परीक्षण -

नागपूरच्या बाजारगाव येथे स्थित असलेल्या सर्वात मोठ्या एक्स्प्लोजीव कंपनीच्या परिसरात या धवन 1 च्या 3 डी प्रिंटेड क्रायोजेनीक इंजिनचे परीक्षण पार पडले. क्रायोजेनीक इंजिन हे इतर इंजिनच्या तुलनेत अधिक विश्वासू स्वस्त असणार आहे. याचा उपयोग लॉन्च व्हेकल विक्रम 1, 2, 3 मध्ये सुद्धा केला जाणार असल्याचे स्कायरूट एरोस्पेसकडून ट्विटर हँडलवरन सांगण्यात आले आहे.

Cryogenic Engine Testing
नागपुरात पार पडली चाचणी

क्रायोजेनिक म्हणजे काय -

अंतराळात कुठलेही क्षेपणास्त्र पाठवण्यासाठी ऊर्जा लागते. भौतिक शास्त्रानुसार कमी तापमान निर्माण आणि उपयोग करणाऱ्या प्रक्रियेला क्रायोजनिक असे म्हणतात. पीएसएलव्ही 3 या अवजड उपग्रहाला कमी इंधनाच्या साह्याने सुमारे ८०० सेकंदापर्यंत अवकाशावर नेण्यासाठी क्रायोजेनिक इंजिनाचा वापर केला जातो. या क्रायोजेनिक इंजिनमध्ये इंधन मधून (- 253) सेल्सिअस लिक्विड हायड्रोजन तर ऑक्सिडायझर म्हणून (-183) लिक्विड ऑक्सिजन वापरले जाते वापरले जाते. इंजिनसाठी लागणारे इंधन अतिशय थंड असल्याने त्याला ‘क्रायोजेनिक इंजिन’ म्हणतात. यात एलएनजी हे अतिशय थंड आणि भविष्यातील इंधन असून याचा वापर पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.