नागपूर: मिनकॉन कॉन्फरन्समध्ये बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. एवढंच नाही तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वन अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. सरकारी अनास्था किती असू शकते, याचं उदाहरण देताना ते म्हणाले की देशभरात रस्त्याचं जाळं विणताना स्वतःच्या घरासमोरील 2 किलोमीटरचं रस्त्या तयार करायला ११ वर्ष लोटली.
देश विकसित कसा होईल मात्र,अजूनही रस्त्या निर्माण करू शकलो नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली. आज ते अधिकारी माझ्यासमोर येतात, तेव्हा त्यांचे चेहरे बघून मला लाज वाटते. कारण दोन किलोमीटरच्या रस्त्यासाठी ३० बैठका घेतल्या आहेत. अगदी स्पष्ट बोलण्यात मला कोणतीही अडचण नाही, पण असेच सुरू राहील तर देश विकसित कसा होईल, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विचारला आहे.
वनविभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी सेक्रेटरी दर्जाचे अधिकारी विरोधी पक्षा सारखे वागतात. जनहिताच्या प्रत्येक कामात अडचणी कश्या निर्माण होतील, त्यांचा प्रयत्न असतो. मी एका अधिकाऱ्याला म्हटलं बायकोवर प्रेम करा फाईलवर का करता असे म्हणत त्यांनी सुधीर मुनगंटीवार आणि वनविभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वनमंत्री आणि वनविभागावर नाराजी उमरेडला जिथे एक ही वाघ आला नाही. तिथे रिजरवेशन टाकून कोळसा खाण बंद करायला नोटीस दिली. अधिकारी काम करत नसेल, तर ही चुकी आपली आहे. लोक आपल्याला म्हणतील, सरकार आपले आहे. जवाबदारी आपली आहे. अधिकारी कामाला वेळेत पूर्ण करत नसेल तर त्यांच्यावर जवाबदारी निश्चित करून त्यांना टर्मिनेट करा, असे देखील ते म्हणाले आहेत.