ETV Bharat / city

मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न - नागपूरात तिथीनुसार शिवराज्यभिषेक सोहळा साजरा

छत्रपती शिवाजी महाराजांचा आज (बुधवारी) तिथीनुसार राज्याभिषेक सोहळा आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही नागपूरच्या महाल परिसरातील गांधी गेट समोर राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला.

शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
author img

By

Published : Jun 23, 2021, 9:57 AM IST

नागपूर - नागपूरच्या महाल येथील शिवाजी चौकात दरवर्षी तिथीनुसार शिवराज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाचे सावट असल्याने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा करण्यात आला. सर्वप्रथम शिवछत्रपतीच्या प्रतिमेला पंचामृताचा अभिषेक करण्यात आला.

शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न

शिवराज्यभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून जनजागृती

दरवर्षी प्रमाणे यंदाही नागपूरच्या महाल परिसरातील गांधी गेट समोर राज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. ज्याप्रमाणे गडकिल्ल्यांमुळे शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण केले, त्याचप्रमाणे कोरोना पासून बचावासाठी लसीकरण करणे आवशयक असल्याचा संदेश विशाल रांगोळीच्या माध्यमातून यावेळी देण्यात आला. सोबतच कोरोना काळात सेवा देणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

हेही वाचा - ओडिशाचे अनोखे शिल्पकार 'रघुनाथ महापात्र'; भारतासोबत पॅरीसमध्येही सोडली आपल्या कलेची छाप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.