ETV Bharat / city

नागपुरात १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरुवात - नागपुरात कोरोना लसीकरण

जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यातील शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १६ तारखेच्या लसीकरणाचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये एका सत्रात १०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार असून जवळपास बारा हजार कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे.

corona vaccination for health workers starts from January 16 in Nagpur
नागपुरात १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरुवात
author img

By

Published : Jan 12, 2021, 5:46 PM IST

नागपूर - नागपूर जिल्हा ग्रामीण भागातील आरोग्य कर्मचारी यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची प्रक्रिया जिल्ह्यामध्ये १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. जिल्ह्यात जवळपास बारा हजारावर आरोग्य कर्मचाऱ्यांची यासंदर्भात नोंद झाली असून १५ ठिकाणी या सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या संदर्भातील आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी लसीकरण संदर्भात तयारीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, आरोग्य उपसंचालक डॉ.संजय जायस्वाल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक थेटे यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा - वर्णद्वेषी शेरेबाजीबद्दल दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो, ''अशांना कडक शिक्षा झाली पाहिजे''

प्रत्येक विभागाने या काळामध्ये घ्यावयाच्या काळजीसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मार्गदर्शन केले. १६ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठीच्या लसीकरणानंतर नागरिकांसाठी सुरु होणाऱ्या लसीकरणाबाबतही चर्चा झाली. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा लसीकरणाचे प्रत्यक्ष काम करणार असले तरी अन्य यंत्रणादेखील या काळात आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडतील,असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्ह्यातील शासकीय व खाजगी आरोग्य यंत्रणेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १६ तारखेच्या लसीकरणाचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये एका सत्रात १०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार असून जवळपास बारा हजार कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे.

पोर्टलवर नोंद झालेल्यांना देणार लस

कोविड पोर्टलवर सध्या ११ हजार ६४५ कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे, या कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. त्यामुळे लसीकरणाच्या जागांची निश्चिती, लस देणारे व घेणारे यांची संपूर्ण व्यवस्था, लसीकरणासाठी साहाय्यभूत उपाय योजना, लसीकरण काळातील स्थिती, शीतीकरण प्रक्रियेत इलेक्ट्रिसिटीचा योग्य व सुरक्षित वापर, कोरोना लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची नोंद घेणे व स्वॅब घेण्याची आवश्यकता,या लसीकरण मोहिमेनंतर राबविण्यात येणारी सामान्य नागरिकांसाठीची लसीकरण योजनेची तयारी, यासंदर्भातही आज चर्चा करण्यात आली.

लसीकरणाचा कार्यक्रम जिल्हास्तरीय राबवणार

जिल्ह्यात सर्व दहा ग्रामीण रुग्णालय, दोन उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र बोरखेडी, गोंडखैरी व सावनेर येथील ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र असे एकूण १५ ठिकाणी हे लसीकरण होणार आहे. ग्रामीण भागातील या मोहिमेचे नियंत्रण जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे करणार आहेत. या शिवाय महानगर पालिकेमार्फत नागपूर शहराकारिता स्वतंत्ररित्या 16 जानेवारी पासून आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी ही मोहीम राबविली जाणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.