नागपूर - ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर (Omicron) खबरदारी म्हणून शराजाह येथून आलेल्या आंतरराष्ट्रीय फ्लाईटमधील 95 प्रवाशांची नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) आरटीपीसीआर चाचणी (RTPCR) करण्यात आली. सकाळी 6 वाजून 45 मिनीटांनी उतरलेल्या या विमानात 95 प्रवाशी होते. मनपाच्या आरोग्य विभागाकडून या सर्व प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह येताच त्या सर्वाना पुढील प्रवासासाठी जाण्यास परवानगी दिली. त्यापूर्वी काहींचे अहवाल येण्याला विलंब झाल्याने त्यांना सकाळी चहा नाश्ता आणि फ्रेश होण्यासाठी आमदार निवास (Nagpur MLA House) येथे काही वेळ थांबवण्यात आले असल्याची माहिती मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर निर्णय -
दक्षिण आफ्रिकेसह काही देशात कोरोना विषाणूचा ओमायक्रॉन (Omicron of corona virus) हा व्हेरियंट समोर आला आहे. त्याचा प्रसार झपाट्याने होत असल्याने केंद्र सरकारने देशात येणाऱ्या परदेशी प्रवाशांच्या चाचण्या करण्याच्या तसेच त्यांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर महापालिकेने (Nagpur Municipal Corporation) नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) आलेल्या परदेशी प्रवाशांची माहिती घेत. त्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्यास सुरूवात केली आहे.
हेही वाचा - Omicron - धारावीवर ओमायक्रॉनचे सावट, 2794 पैकी 13 परदेशी प्रवासी पाॅझीटिव्ह