ETV Bharat / city

दिलासादायक..! नागपुरात कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५ दिवसांवरून २१ दिवसांवर - नागपूर कोरोना घडामोडी

नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या सतत वाढत आहे. महानगरपालिकेची यंत्रणा यावर नियंत्रण आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५ दिवसांवरून वाढून तो २१ दिवस झाला आहे.

नागपूर
नागपूर
author img

By

Published : Sep 19, 2020, 12:05 AM IST

नागपूर - कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामध्ये नागपूरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहरात कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५ दिवसांवरून वाढून तो २१ दिवस झाला आहे. आरोग्य विभागाद्वारे देण्यात आलेल्या माहितीनुसार आता शहरात २१ दिवसात कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट होत आहे.

या अगोदर कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५ दिवस होता. तो वाढून आता २१ दिवस झाला आहे. २७ जुलैनंतर यामध्ये मोठी सुधारणा झालेली दिसून येत आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जून महिन्यात दुप्पटीचा दर ४४ दिवसांचा होता नंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये तो १५ दिवसांपर्यंत आला आणि आता २१ दिवसापर्यंत पोहचला असून ही दिलासादायक बाब आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री. जलज शर्मा यांनी सांगितले.

हेही वाचा - राज्यात दिवसभरात २१ हजार ६५६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; ४०५ मृत्यू

दुप्पटीचा कालावधी वाढल्यामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचा निष्कर्ष काढता येऊ शकतो. नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या सतत वाढत आहे. महानगरपालिकेची यंत्रणा यावर नियंत्रण आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मागील २० दिवसांमध्ये मनपाच्या माध्यमातून ५० कोविड चाचणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. पालिकेचे जलद प्रतिसाद पथक पॉझिटिव्ह रुग्णांचे ‘हायरिक्स कॉन्टॅक्ट’ शोधून त्यांची चाचणी करीत आहे. मात्र, अजूनही कोरोना रुग्ण आपली माहिती लपवत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळेच रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण होत आहे.

हेही वाचा - हृदयद्रावक..! आठ वर्षांचे बाळ झाले पोरके, वीज पडल्याने आई-वडिलांचा जागीच मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.