नागपूर - राज्याची उपराजधानी नागपूर शहर हे बाबासाहेबांच्या दीक्षाभूमीकरता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यलयाकरता ओळखले जाते. सर्वात महत्वाचे म्हण्जे दोन्ही ठिकाणी ऑक्टोबर महिन्यांतच सर्वात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. मात्र, यावर्षी कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे या कार्यक्रमांवर अनिश्चितेचे सावट असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून दीक्षाभूमी येथे १४ ऑक्टोबर आणि विजयादशमीचा कार्यक्रम रद्द करण्याचे जाहीर केले असताना संघाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे संघ कार्यक्रमा संदर्भात काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
कोरोना प्रादुर्भाव: संघाचा विजयादशमी कार्यक्रम होणार की नाही; अद्याप निर्णय नाही - नागपूर आरएसएस विजया दशमी कार्यक्रम बातमी
या कार्यक्रमाच्या माध्यमातूनच सरसंघचालक मोहन भागवत देशातील राजकीय, आर्थिक,सांस्कृतिक आणि शैक्षणिक सह अनेक विषयांवर भाष्य करत असतात,त्यामुळे या कार्यक्रमाला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र या वर्षी गेल्या अनेक वर्षाची परंपरा खंडित होण्याची शक्यता आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीकडून केवळ मोजक्या लोकांच्या उपस्थिती कार्यक्रम होणार आहे. त्याच प्रमाणे संघ देखील मोजक्या स्वयंसेवकांच्या उपस्थितीच शस्त्रपूजन होण्याची शक्यता आहे.