ETV Bharat / city

'कोरोनाच्या परिस्थितीत नागपूरात उपचारासाठी ५ हजार बेड्सची गरज'

author img

By

Published : Apr 14, 2021, 5:44 PM IST

नागपूर जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती बिघडत चालली असताना रुग्णांना बेड मिळत नाही. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेशन, डॉक्टर ,नर्स कमी पडत आहे. यामुळे उपचाराअभावी मृत्यूदर वाढू लागला आहेत.

नागपूर - जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती बिघडत चालली असताना रुग्णांना बेड मिळत नाही. ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेशन, डॉक्टर, नर्स कमी पडत आहे. यामुळे उपचाराअभावी मृत्यूदर वाढू लागला आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने नागपूरातील हॅाटेल्स ताब्यात घेऊन आरोग्य व्यवस्था उभारण्याची गरज असल्याचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

शासनाने आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी ५००० बेड्सची सोय करावी-

जिल्ह्यातील बीएमएस डॅाक्टर आणि नर्सेस खासगी रुग्णालायत कार्यरत आहेत. त्यांना पॅकेज देऊन शासनाने आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी ५००० बेड्सची सोय करावी. शहर आणि ग्रामीण भागात ज्या पद्धतीने रोज रुग्ण मिळत आहे. याची परिस्थिती पाहता २ हजार ऑक्सिजन बेड, ५ हजार बेड हे तयार होणार नाहीत तोपर्यंत या परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्या जाऊ शकत नाही.

रुग्णालायत ऑक्सिजनचा तुटवडा-

नागपूरात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. शहरात परिस्थिती पाहता रेमडेसिवीर इंजेक्शन मिळत नाही आहे. रुग्णालायत ऑक्सिजन मिळत नाही आहे. ही परिस्थिती प्रशासनामुळे उद्भवली आहे. योग्य नियोजन केले असते तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. याला जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त जबाबदार असल्याचाही आरोप बावनकुळे यांनी केला आहे.

हेही वाचा- आज सायंकाळी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांसोबत मुख्यमंत्र्यांची बैठक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.