नागपूर : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे त्यांच्या एका विधानामुळे वादात सापडले आहेत. साधु आणि संतांमध्ये फरक असून आजचे साधू नालायक असल्याचे विधान वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात केले आहे. या विधानावर आपण ठाम असल्याचे वडेट्टीवार यांनी नंतर बोलतानाही स्पष्ट केले आहे.
मेळाव्यात बोलताना केले विधान
एका मेळाव्यात बोलताना वडेट्टीवार यांनी हे विधान केले. साधू आणि संत दोन्ही वेगळे असतात. साधूंवर कुणीही विश्वास ठेवू नये, ते नालायक असतात असे वडेट्टीवार यावेळी बोलताना म्हणाले. त्यांच्या या भाषणाची क्लिपही समोर आली आहे.
वक्तव्यावर ठाम असल्याचे प्रतिपादन
या विधानाविषयी नंतर विचारणा केली असता आपण त्यावर ठाम असल्याची भूमिका वडेट्टीवार यांनी घेतली आहे. आपल्या राज्याला संतांची संस्कृती लाभली आहे. मात्र संत आणि साधू यांच्यात फरक असल्याचं ते म्हणाले. संत हा समाजासाठी समर्पित आहे. तर साधू हे समाजाला लुबाडणारे आहे. यावर मी आजही ठाम असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ओबीसी समाजाने रामरहिम आणि आसाराम यासारख्या साधुंच्या मागे लागू नये, तर संतांची शिकवण घेऊन समाजाला पुढे न्यावं असे वडेट्टीवार म्हणाले.
हेही वाचा - केंद्राचा अर्थसंकल्प म्हणजे वांझोट्या म्हशीला लेकराची आस - विजय वडेट्टीवार