नागपूर - केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या विरोधात नागपुरमध्ये महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्या चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. स्मृती इराणी यांनी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह देशातल्या प्रत्येक महिलेची माफी मागावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. ( Women Congress In Nagpur ) त्यासाठी नागपूर महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयावर चाल करून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांना रास्ता रोखल्याने संघर्ष टळला आहे.
प्रत्येक महिलेची माफी मागितली पाहिजे - काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या विरोधात संसदेत वादग्रस्त केले आणि त्यांचा अपमान केला असा आरोप महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसने आज आंदोलन केले. स्मृती इराणी यांनी सोनिया गांधींची तसेच देशाच्या प्रत्येक महिलेची माफी मागितली पाहिजे अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
भाजपच्या महिला कार्यकर्त्या उत्तर देण्यासाठी एकवटल्या - महिला कार्यकर्त्यांचा मोर्चा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती समजतात भाजपच्या महिला कार्यकर्त्याही कार्यालयाजवळ एकत्रित झाल्या होत्या.
पोलिसांनी घेतली दक्षता - काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आम्हाला समोर आल्यानंतर हिंसक घडामोडी घडू शकतात. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडेल याची संपूर्ण कल्पना पोलिसांना होती, त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरक्षेची पुर्ण व्यवस्था केली होती. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अंतर ठेवण्यात पोलिसांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.
हेही वाचा - Eknath Shinde: आता आठ वाजताचा भोंगा बंद झाला, मुख्यमंत्र्यांची राऊतांच्या अटकेवर मिश्किल टिप्पणी