ETV Bharat / city

नागपुरात किरीट सोमैया यांच्या विरोधात कॉंग्रेसने दाखल केला 1 रुपये मानहानीचा दावा - काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे

भाजपा नेते किरीट सोमैया यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष हे भ्रष्टाचारी आहे, असा आरोप केला होता. सोमैया यांच्याकडे आरोप करत असतांना कोणतेही पुरावे नाही, असाही टीकाही यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. त्यांच्याकडे भष्ट्राचाराचे ठोस पुरावे असल्यास ते सादर करावे. नाहीतर भष्ट्राचाराचा आरोप केला त्यांनी माफी मागावी, असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते

अतुल
अतुल
author img

By

Published : Nov 8, 2021, 4:14 PM IST

Updated : Nov 8, 2021, 4:47 PM IST

नागपूर - भाजपा नेते किरीट सोमैया यांना कुठलेही पुरावे नसताना बेछूट आरोप करण्याची सवय झाल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. त्यांच्या या सवयीला आळा घालण्यासाठी त्यांच्या विरोधात एक रुपयाचा दावा नागपूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात कॉंग्रेसने दाखल केला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी हा 1 रुपयांचा दावा दाखल केला आहे. भाजपा नेते किरीट सोमैया यांनी एका वृत्तवाहिनीवर बोलत असताना महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष हे भ्रष्टाचारी आहे, असा आरोप केला होता. सोमैया यांच्याकडे आरोप करत असतांना कोणतेही पुरावे नाही, असाही टीकाही यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे. त्यांच्याकडे भष्ट्राचाराचे ठोस पुरावे असल्यास ते सादर करावे. नाहीतर भष्ट्राचाराचा आरोप केला त्यांनी माफी मागावी, असे आवाहन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते. परंतु किरीट सोमैया यांनी माफी न मागितल्याने त्यांच्यावर 1 रुपयांचा सांकेतिक स्वरूपाचा मानहानीचा दावा दाखल केला असल्याचेही यावेळी लोंढे म्हणाले.

कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे
भाजपा नेते किरीट सोमैया हे तथ्यहीन आरोप करत आहे. त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नसून मागील अनेक दिवसांपासून त्याचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे. ते सातत्याने मागील दोन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना पक्षावर बेछूटपणे भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनामी करत आहे. ते आरोप करतात पुरावे मात्र देत नाही, असेही काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी सांगितले. सोमैया यांच्या खोटे बोलण्याच्या प्रवृत्तीमुळे राजकारणी नेत्यांवर असलेल्या जनतेचा विश्वासाला तडा गेला आहे. त्यांनी अनेक आरोप यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते असो की अन्य पक्षांच्या नेत्यांवर केले आहे. पुढे त्यात काहीही झाले नाही. त्यामुळे त्यांना ही सवय आहे. या सवयीला आळा घालण्यासाठीच हा दावा दाखल केल्याचे अतुल लोंढे म्हणालेत.

हेही वाचा - अनिल देशमुखांचा ईडीने घेतला ताबा; ऑर्थर रोड तुरुंगातून ईडी कार्यालयात आणले

Last Updated : Nov 8, 2021, 4:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.