ETV Bharat / city

काँग्रेस नगरसेवकाकडून अधिकाऱ्यांना अपशब्द वापरत दिली धमकी - काँग्रेस नगरसेवक

नागपुरात नगरसेवक बंटी शेळके यांच्याकडून विभागीय आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांसंदर्भात अपशब्द वापरत त्यांना जाळून टाकण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Congress corporator threatens
Congress corporator threatens
author img

By

Published : Apr 28, 2021, 6:52 PM IST

Updated : Apr 28, 2021, 7:10 PM IST

नागपूर - नागपुरात नगरसेवक बंटी शेळके यांच्याकडून विभागीय आयुक्तांसह इतर अधिकाऱ्यांसंदर्भात अपशब्द वापरत त्यांना जाळून टाकण्याची धमकी दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विभागीय आयुक्ताच्या दालनाबाहेर हा प्रकार घडला असून व्हिडिओमध्ये काँग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके हे संताप व्यक्त करताना अपशब्द बोलून गेलेत. यात प्रशासनाने कुठले करवाईचे पाऊल अद्याप उचलले नसल्याचीही माहिती पुढे येत आहे.

नागपुरात कोरोना रुग्णांना अनेक अडचणींना सामोरे जात हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहे. कॉंग्रेसचे नगरसेवक बंटी शेळके हे खासगी रुग्णालय सर्वसामान्यांची लूट करत आहेत, अशी तक्रार घेऊन विभागीय आयुक्तांना भेटायला गेलेल्या काँग्रेसच्या शिष्टमंडळातील एका काँग्रेस नगरसेवकाने विभागीय आयुक्तांचा सर्व अधिकारांबद्दल अपशब्द वापरले.

काँग्रेस नगरसेवकाकडून अधिकाऱ्यांना अपशब्द
काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके विभागीय आयुक्त अधिकाऱ्यांसोबत चर्चा करताना अचानक संतापले आणि कार्यालयातच जोरजोरात शिवीगाळ करत प्रशासन कोरोना संकटाबद्दल गंभीर नाही, असा आरोप केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. एवढेच नाही तर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नगरसेवक बंटी शेळके यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता संतापाच्या भरात बंटी शेळके यांनी विभागीय आयुक्त यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना जाळून टाकण्याची धमकी दिली. मंगळवारी दुपारी काँग्रेस प्रदेश प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सोबत नागपूर शहराचे काँग्रेस अध्यक्ष आणि आमदार विकास ठाकरे आणि काही इतर काँग्रेस नेते विभागीय आयुक्तांकडे नागरिकांच्या विविध तक्रारी घेऊन गेले होते. त्याच वेळी काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके अचानक संतापले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत जाळून टाकण्याची धमकी दिली.

Last Updated : Apr 28, 2021, 7:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.