नागपूर - सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाने चुकीची माहिती समाज माध्यमात (whatsapp वर) टाकणाऱ्यांविरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हेही वाचा - युवा आमदारांशी संवाद: 'महाराष्ट्राला गरज असताना सगळी नाती एकत्र'
सरसंघचालक मोहन भागवत नवीन भारतीय संविधान बनवत असल्याचा खोटा प्रचार समाज माध्यमातून करण्यात येत आहे. यासंदर्भातली एक pdf फाईल बनवून 'व्हाट्स अॅप'वर फिरवण्यात येत आहे. या pdf फाईलच्या मुखपृष्ठावर सरसंघचालकांचे छायाचित्र वापरण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणाशी आरएसएस चा कुठलाही संबंध नाही. मात्र, या माध्यमातून आरएसएसची बदनामी केल्या जात आहे. त्यामुळे या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करून चौकशीची मागणी संघाकडून करण्यात आली आहे.
हेही वाचा - 'हे सरकार सूड उगवणारे नाही'; मुख्यमंत्री ठाकरेंचा भाजपला टोला