ETV Bharat / city

नागपूर पोलिसांचा स्तुत्य उपक्रम, चोरीला गेलेले १२५ मोबाईल केले परत

नागपूर शहर पोलीस विभागाने ज्या नागरिकांचे मोबाई चोरीला गेले होते, गहाळ झाले होते किंवा हरवलेले मोबाईल असे एकूण १२५ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. अनेक प्रकरणात पोलिसांना मोबाईल मालकाचा शोध घ्यावा लागला होता. त्यानंतर त्या सर्वांना आज शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोबाईल परत देण्यात आले आहेत.

author img

By

Published : Jul 9, 2021, 6:32 PM IST

नागपूर शहर पोलीस विभागाने ज्या नागरिकांचे मोबाई चोरीला गेले होते, गहाळ झाले होते किंवा हरवलेले मोबाईल असे एकूण १२५ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत.

नागपूर - नागपूर शहर पोलीस विभागाने ज्या नागरिकांचे मोबाई चोरीला गेले होते, गहाळ झाले होते किंवा हरवलेले मोबाईल असे एकूण १२५ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. अनेक प्रकरणात पोलिसांना मोबाईल मालकाचा शोध घ्यावा लागला होता. त्यानंतर त्या सर्वांना आज शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मोबाईल परत देण्यात आले आहेत. ज्याची किंमत ३७ लाख रुपये इतकी आहे. मोबाईल चोरीला गेल्यानंतर तो कधी परत ही मिळू शकतो याची साधी कल्पना देखील नसताना, अचानकपणे आणि अनपेक्षितरित्या नागपूर पोलिसांनी या सर्व १२५ मोबाईल मालकांना सुखद धक्का दिला आहे.

नागपूर शहर पोलीस विभागाने ज्या नागरिकांचे मोबाई चोरीला गेले होते, असे एकूण १२५ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत केले आहेत. त्याविषयी बोलताना नागपूर शहर आयुक्त अमितेशकुमार

तंत्रज्ञानाच्या या युगात मोबाईल हा सर्वात महत्वाचे साधन

दिवसरात्र मोबाईल फोन हाताळताना कोणत्याही कामाची कल्पना आता मोबाईल शिवाय होऊ शकत नाही. अशात अचानकपणे मोबाईल फोन जेव्हा गहाळ होतो किंवा चोरीला जातो तेव्हा अपंग झाल्याची भावना त्या मोबाईल मालकाच्या मनात तयार होणे स्वाभाविक आहे. एकदा मोबाईल चोरीला गेला म्हणजे तो पुन्हा परत कधीही मिळणारच नाही, अशी सर्वांचीच धारणा झालेली आहे. तंत्रज्ञानाने परिपूर्ण मोबाईल चोरीला गेल्यानंतर ज्यावेळी पोलिसांकडे तक्रार केली जाते, तेव्हा पोलीस त्यापैकीच एका तंत्रज्ञानाचा उपयोग मोबाईल शोधण्याचे काम करत असतात.

अनपेक्षितपणे मोबाईल मिळाल्याने आनंदाला सीमाच उरली नाही

आज नागपूर पोलिसांनी ज्या १२५ लोकांना मोबाईल फोन परत केले आहेत. त्यामध्ये असे अनेक लोक होते ज्यांना पहिला मोबाईल चोरी गेल्यानंतर दुसरा मोबाईल फोन घेणे शक्य नव्हते. मोबाईल चोरीला गेल्याचे दुःख इतके होते की, दोन दिवस तर जेवणच घशाखाली उतरले नसल्याची भावना एका महिलेने व्यक्त केली. मात्र, आज अनपेक्षितपणे मोबाईल फोन परत मिळाल्याने आनंदाला सीमाच उरली नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

सायबर पोलीस ठाण्याची भूमिका महत्वाची

नागपूर शहराचा विस्तार ज्या वेगाने होतो आहे, त्यापेक्षा अधिक वेगाने सायबर गुन्हे घडू लागले आहेत. म्हणून काही महिन्यांपूर्वी नागपूर शहर पोलिसांनी सायबर पोलीस ठाण्याची निर्मिती केली आहे, ज्यामध्ये मोबाईल हरवणे, चोरीला जाने, बँक फ्रॉड या सारख्या गुन्ह्यांचा तापस केला जातो. नागपूर शहरातील सायबर पोलिसांनी १२५ मोबाईल जप्त केल्यानंतर ते त्या मुळ मालकांपर्यंत पोहचण्याचे काम केले आहे. काही दिवसांपूर्वी एका इसमाच्या बँक खात्यातून १६ लाख रुपये गहाळ झाले होते. ते देखील सायबर पोलिसांनी त्या मूळ मालकाला परत मिळवून दिले आहेत. शहरात सायबर गुन्हे नक्कीच वाढत आहेत. मात्र, ते रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम असल्याचे मत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी व्यक्त केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.