नागपूर- ड्रग्स तस्करीत महाविद्यालयीन तरुणाचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एकाच वेळी शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली. यामध्ये महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडे १४.७५ ग्राम एमडी ड्रग्स आणि विदेशी बनावटीचे पिस्टलसह काडतूस आढळून आले आहे. तर दुसऱ्या कारवाईमध्ये सुद्धा एका आरोपीला १.१४ ग्रॅम एमडी ड्रग्ससह अटक केली आहे.
एनडीपीएसच्या पथकाने जरीपटका भागात रचला होता सापळा-
नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत एक इसम ड्रग घेऊन येणार आहे. या माहितीच्या आधारे एनडीपीएसच्या पथकाने जरीपटका भागात सापळा रचला होता. ज्या इसमाची माहिती समजली होती. त्या वर्णनाचा इसम दिसताच अमली पदार्थ विरोधी पथकाने शेख साहिल शेख मोहम्मद नामक इसमाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. तेव्हा त्याच्या जवळ १.१४ ग्रॅम एमडी ड्रग्स पावडर आढळून आले. त्याची चौकशी सुरू केली असताना निखिल सावडिया नावाचा व्यक्तीची माहिती पुढे आली. त्यानंतर एनडीपीएसच्या पथकाने त्याला अटक करून त्याच्या जवळून १४.७५ ग्राम एमडी ड्रग्स आणि विदेशी बनावटीचे पिस्टल सह काडतूड जप्त केले.
ड्रग्स तस्करीत विद्यार्थ्यांचा सहभाग-
नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ज्या निखिल सावडिया नावाच्या आरोपीला अटक केली आहे. तो महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. तो बारावीचा विद्यार्थी आहे. त्याची चौकशी पोलिसांनी केली. तेव्हा मृणाल गजभिये नावाच्या गुंडाचे नाव पुढे आले आहे. त्यानेच निखिलला एमडी ड्रग्स आणि पिस्टल दिले होते. आरोपीने पिस्टल आणि ड्रग्स कुणाला देण्यासाठी निखिलकडे सोपवले होते. यासंदर्भात अद्याप पोलिसांनी खुलासा केलेला नाही.
हेही वाचा- गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना मोदी झाले भावूक