नागपूर - उपराजधानी नागपूरसह संपूर्ण विदर्भात थंडीचा जोर वाढल्याने नागरिकांमध्ये हुडहुडी भरायला सुरुवात ( Vidarbha Weather Update) झाली आहे. मागील आठ दिवसांपासून तापमानात चार ते सहा अंश सेल्सिअसची घसरण झाली ( temperature decreased in Nagpur ) आहे. तर पुढील आठवड्यात सुद्धा आणखी तीन ते पाच डिग्री तापमान कमी होईल असे भाकीत हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. गेल्या चार दिवसांमध्ये नागपूरचे तापमान ११ ते १३ अंश सेल्सियसच्या दरम्यान नोंदविण्यात आले आहे, तर हीच परिस्थिती संपूर्ण विदर्भात सुद्धा आहे.
नववर्षाचे स्वागत बोचऱ्या थंडीतच -
विदर्भाच्या भौगोलिक परिस्थिती नुसार परतीच्या पाऊसानंतर नोव्हेंबर महिन्याच्या सुरूवातीला थंडीच्या आगमनाचा अंदाज असतो, त्यानुसार यावर्षी अगदी वेळेवर थंडी पडायला सुरुवात झाली होती. मात्र गेल्या महिन्यात सलग १५ दिवस ढगाळ वातावरणामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला होता. मात्र आता आकाश स्वच्छ झाल्यामुळे पुन्हा एकदा थंडीने जोर धरलेला आहे. गेल्या चार ते दिवसांमध्ये नागपुरातील तापमानाचा पारा चार ते सहा अंशाने खाली आला आहे. उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यामुळे विदर्भात थंडीचा जोर वाढला आहे. येत्या काही दिवसांमध्ये आणखी थंडी वाढणार असल्याने नागपूरकरांना नववर्षाचे स्वागत बोचऱ्या थंडीतच करावे लागणार आहे.
विदर्भातील ११ जिल्ह्याचे तापमान -
शुक्रवारी उपराजधानी नागपूर मध्ये १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर चंद्रपूरमध्ये १३ अंश तापमानाची नोंद झाली आहे. गोंदिया येथे १२.६ अंश सेल्सिअस, गडचिरोलीत १२.२ डिग्री तापमान, वर्ध्यात १३ अंश सेल्सिअस, अमरावतीत १२.३, यवतमाळमध्ये १३ डिग्री, अकोल्यात १६.४ अंश सेल्सिअस, वाशिममध्ये ११.५ अंश सेल्सिअस, बुलढाण्यात १५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
पिकांच्या दृष्टीने वाढलेली थंडी समाधानकारक -
थोडे उशिरा का होई ना विदर्भात थंडीमुळे गारठा वाढलेला आहे. ही थंडी गहू, तूर सह हिरव्या पालेभाज्यांच्या दृष्टीने थंडी महत्वाची मानली जाते.
हेही वाचा - थंडी वाढली, शोकोट्या पेटल्या; गावोगाव गप्पा रंगल्या