नागपूर - नागपूर विधान परिषदेच्या निवडणुक मतदानाची प्रक्रिया पार पाडताच भाजप आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची रंजक ( Nagpur MLC election controversies ) मालिका रंगली आहे. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनामाची ( Chandrashekhar Bawankule demand resignation of Nana Patole ) मागणी केली. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी तर चक्क बावनकुळे यांची ( Atul Londhe slams Chandrashekhar Bawankule ) लायकी काढली आहे.
काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद उद्गारामुळे भाजप नेते आक्रमक झाले आहेत. अतुल लोंढे यांनी काय करून प्रवक्ते पद मिळवले आहे, हे सांगण्याची आम्हाला गरज पडू देऊ नका, असा इशारा धर्मापाल मेश्राम ( BJP leader Dharmapal Meshram warns Congress ) यांनी लोंढे यांना दिला आहे.
हेही वाचा-भारतात कॅन्सर सारख्या वाढणाऱ्या मुस्लिम समाजावर केमोथेरपी गरज - विहिंप अध्यक्ष रवींद्र नारायण
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पटोलेंच्या राजीनाम्याची केली मागणी
दोन दिवसांपूर्वी बावनकुळे यांनी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. दोन मंत्र्यांच्या दबावात येऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मतदानाच्या १२ तास आधी उमेदवार बदलून कार्यकर्त्यांवर अन्याय केल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. त्यामुळे नाना पटोले यांनी तात्काळ प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली होती. यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी बावनकुळे यांना चपराशी असल्याचे संबोधले आहे. त्यामुळे या विषयावरून नागपूरचे राजकारण चांगलेच तापले आहे.
हेही वाचा-2 वर्षांनंतर नागपुरात खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन; संजय दत्तच्या हस्ते होणार उद्घाटन
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढेची जीभ घसरली-
काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, की बावनकुळे यांना पराभव समोर दिसू लागल्याने बावचळले आहेत. मतदानाच्या ऐन वेळी काँग्रेसने आपला उमेदवार बदलला ही काँग्रेसची रणनीती असू शकते. हे समजण्याइतकेही बावनकुळे यांचे डोके ठिकाणावर नाही. तुमची भाजपमध्ये शिपायापेक्षा अधिक किंमत राहिलेली नाही. ही निवडणूक जिंकण्यासाठी घोडेबाजार करावा लागेल. त्यामुळे तुम्हाला भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे, ही वस्तुस्थिती तुम्ही समजून घ्या. पदवीधर निवडणुकीत संदीप जोशी यांच्या पराभवानंतर तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला असता तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते. पण त्या ऐवजी स्वतःचा पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने डोक्यावर पडल्याप्रमाणे आपण काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे. आधी तुम्ही तेवढी उंची गाठा व नाम कमवा. संघर्षातून राजकीय जीवन घडवा, मग नाना पटोले यांचा राजीनामा मागा असा टोला लोंढे यांनी बावनकुळे यांना लावला आहे.
भाजप नेत्याचे लोंढेना प्रतिउत्तर
भाजप प्रदेश सचिव धर्मपाल मेश्राम म्हणाले, की काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी बावनकुळे यांची लायकी काढावी, हे कोणत्याही राजकीय परिभाषेत बसत नाही. नाना पटोले आणि अतुल लोंढे हे स्वतःच्या वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात कोलांट्या उड्या मारतात. त्यांना स्वतःच्या संघर्षाचा इतिहासच नाही. त्यांनी धादांत खोटे बोलून प्रत्येक समाजाला फसवून राजकारण केले. तुमचा पक्ष राहुल आणि सोनिया गांधी यांच्या दावणीला बांधलेला आहे. तुमची काहीही लायकी नाही, उलट तुम्ही त्यांचे सेवक आहात, अशी टीका धर्मपाल मेश्राम यांनी केली.