नागपूर: माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांचं (Chhagan Bhujbal) शाळेत होण्याऱ्या सरस्वती पूजनासंदर्भातील विधान (Statement regarding Saraswati Puja) चांगलचं गाजलं. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भूजबळांचा समाचार घेतला. छगन भुजबळ यांचे वक्तव्य निंदनीय आहे. भुजबळ यांनी सरस्वती मातेच्या अस्तित्वाचा प्रश्न उपस्थित केला. तसेचं छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे ओवैसी अशी टिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केली आहे. अजित पवार यांनी सत्तेत येण्याचे स्वप्न आता बघू नये. गेल्या अडीच वर्षांत त्यांनी महाराष्ट्रात मोगलशाही आणि एकतर्फी सरकार चालवलं असा आरोप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
नाना पटोलेंना देवेंद्र फडणवीसांच्या क्षमतेचा अंदाज नाही- काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पायडर-मॅन आहेत, असं वक्तव्य केलं होत. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्या क्षमतेबद्दल त्यांना माहिती नाही. त्यांचे कारखाने नाही. बँका नाही. की दुसरे उद्योग नाहीत. देवेंद्र फडणवीस दिवसातील 18 तास जनतेसाठी काम करतात. देवेंद्र फडणवीस यांनी सक्षमपणे महाराष्ट्र सांभाळलेला आहे. त्यामुळे त्यांच्या शब्दाबद्दल कोणी बोलावे हे सूर्याला दिवा दाखवण्यासारखे असल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.
2024 पर्यंत भाजपमध्ये मोठी इनकमिंग- (incoming in bjp) 2024 पर्यंत महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इनकमिंग होणार आहे. भविष्यात मोठे झटके राष्ट्रवादी आणि काँग्रेसला बसणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी जर टोमणे सभा बंद नाही केली तर आहे तेही ते निघून जातील. त्या जागेवर पोस्टरवर आपले कुटुंब आपली जबाबदारी एवढे शिल्लक राहील असा घणाघात उद्धव ठाकरे यांच्यावर बावनकुळे यांनी लगावला.