ETV Bharat / city

देवेंद्र फडणवीसांसारख्या समजदार नेत्याने 'याचा' विचार करावा - छगन भुजबळ - फडणवीसांनी याचा विचार करावा-भुजबळ

मंत्री, नेते आणि अधिकाऱ्यांवर ज्या पद्धतीने केंद्रीय संस्थांचा वापर सुरू आहे, त्याने भाजपची प्रतिमा उंचावणार आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या समजदार नेत्याने याचा विचार करावा असेही भुजबळ म्हणाले. ते

देवेंद्र फडणवीसांसारख्या समजदार नेत्याने 'याचा' विचार करावा - छगन भुजबळ

author img

By

Published : Oct 18, 2021, 12:21 PM IST

Updated : Oct 18, 2021, 2:35 PM IST

नागपूर : मंत्री, नेते आणि अधिकाऱ्यांवर ज्या पद्धतीने केंद्रीय संस्थांचा वापर सुरू आहे, त्याने भाजपची प्रतिमा उंचावणार आहे का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या समजदार नेत्याने याचा विचार करावा असेही भुजबळ म्हणाले. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंतचे सर्वात भष्ट्र सरकार हे महाविकास आघाडी सरकार आहे असे म्हटले आहे. यावर छगन भुजबळ यांनी तुम्ही काय करता हे आम्हाला सगळे कळते त्यानंतर आम्ही चुका दुरुस्त करतो. सकाळी शपथविधी केला नंतर कळले. हे सरकार पडणार नाही मजबूत सरकार आहे. पण केंद्रीय संस्थाचा वापर नेते मंडळी त्यांच्या कुटुंबावर होत आहे. त्याचामुळे भाजपची प्रतिमा उंचावेल की, लोकांचे प्रेम कमी होईल याचा विचार यंत्रणांनी नाही केला तरी फडणवीस यांच्यासारख्या समजदार नेत्यांनी करावा. महाराष्ट्राच्या जनतेवर याचा काय परीणाम होईल याचा विचार करावा असे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

एजन्सीचा उपयोग शत्रूत्व भावनेतून होत आहे
सातत्याने केंद्रीय एजन्सीचा वापर करून महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न राज्यात सुरू आहे. राजकारणात अशा पद्धतीच्या लढाया लढाव्याच लागतात. लोकशाही मार्गाने जे योग्य असेल ते करावे पण ज्या पद्धतीने या कारवाई सुरू आहे त्या शत्रूत्व भावनेतून केल्या जात असल्याचे म्हणत हे चुकीचे आहे असेही ते म्हणाले. यापूर्वी आमच्या घरावर 17 वेळा कारवाई झाली आहे. आत होतो तेव्हाही कारवाई सुरू होत्या. त्यामुळे हा धाडी पाडून करवाई करण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे त्यावर "ये जनता सब जानती है" असे म्हणाले.

मी शिवसेनाच! ओबीसींना न्याय देण्यासाठी सोडली
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसींचे नेते हे नावापुरते आहे अशी टीका केली. त्यावर बोलताना छगन भुजबळ म्हणाले की मी शिवसेनाच! ओबीसींसाठी सोडली. यासाठी काय संघर्ष करावा लागला हे सर्वांनाच माहीत आहे. ओबीसींना आरक्षण मिळावे म्हणून मी सातत्याने प्रयत्न करत आहे. मात्र ओबीसीविरोधी लोक कोर्टात जाऊन वेळोवेळी अडचणी निर्माण करत आहे. पण महाविकास आघाडी ओबीसींना आरक्षण देण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले.

नागपूर धान्य घोटाळ्याची संपूर्ण चौकशी होणार
नागपूरच्या धान्य घोटाळ्यासंदर्भात माहिती मिळाली आहे. दोषींवर योग्य पद्धतीने कारवाई केली जाईल. यात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याशी बोलणं झाले आहे की स्पेशल आयजींची महाराष्ट्रासाठी नेमणूक करावी आणि या घोटाळ्याचे मूळ शोधून काढले जाणार आहे. खोलात जाऊन चौकशी होणार असेही ते म्हणाले. नागपूरच्या कंत्राटदारांवरही कारवाई होणार आहे. लोकशाही आहे. दिल्लीतून आले, याला उचल त्याला उचल असे करता येणार नाही. धान्य घोटाळ्याची कारवाई होणार म्हणत इथेही केंद्राकडून सुरू असलेल्या कारवाईला धरून चिमटा काढला. यावेळी विखे पाटील यांनी सांगलीच्या नेत्यांचा पापाचा घडा भरला आहे म्हणत बाळासाहेब थोरात यांच्यावर लक्ष्य केले. त्यावर मात्र छगन भुजबळ यांनी पलटवार करत यांनी स्वतःचे घडे तपासले पाहिजे म्हणून त्याच्या टीकेला पलटवार दिला.

हेही वाचा - फडणवीसांना त्यांचे मुख्यमंत्रीपद कसे गेले हेच कळलेले नाही, सामना अग्रलेखातून विरोधी पक्षाचा समाचार

Last Updated : Oct 18, 2021, 2:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.