नागपूर - देशभरातील बँका संपावर असण्याचा मोठा परिणाम आर्थिक उलाढालीवर झालेला आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियननेच्यावतीने बँकेच्या खासगीकरणाला विरोध करत दोन दिवसाच्या संपाची घोषणा केली. या दोन दिवसात नागपूर विभागांतर्गत येणारा बँकांचा विचार केल्यास साधारण अडीच हजार कोटींचे व्यवहार खोळंबले आहेत.
बँक कर्मचारी संघटनांच्या संपामुळे दोन लाख धनादेश (चेक) हे वटवण्याच्या प्रतीक्षेत असल्याचे बँकिंग क्षेत्रातील ऑफिसर संघटनेचे विभागीय सचिव राहुल गजभिये यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.
हा संप कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी नाही तर समान्य ग्राहकांच्या हक्कासाठी-
राहुल गजभिये म्हणाले की, बँकांचे खासगीकरण करण्याच्या सरकारच्या धोरणाला विरोध दर्शवण्यासाठी संपाचे हत्यार बँक कर्मचारी संघटनेने उचलले आहे. हा संप बँक कर्मचाऱ्यांना वैयक्तिक फायद्यासाठी केला नाही. तर सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी केला जात असल्याचे संघटनेकडून सांगितले जात आहे. सरकारी बँका या कॉर्पोरेट घराण्याच्या घशात जाऊ नये, यासाठीचा हा विरोध आहे. आज जर या धोरणाला विरोध केला नाही तर, भविष्यात कठीण परिस्थिती निर्माण होणार आहे. यात सध्या दोन बँकाचे खासगीकरण करण्याच्या निर्णय सरकारने घेतला आहे. उद्या उर्वरीत बँकाच्या बाबतीत हे घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
हेही वाचा-बनावट लग्न करणाऱ्या महिलेसह तिच्या साथीदाराच्या आवळल्या मुसक्या
कॉर्पोरेट घराणे स्वतःच्या फायद्यासाठी बँकांचा उपयोग करण्याची शक्यता-
बँक खरेदीसाठी समान्य माणूस नाही तर देशातील कॉर्पोरेट घराणे समोर येणार आहेत. त्यांचा उद्देश हा नफा मिळवणे असणार आहे. बँकांमधील सर्वसामान्य नागरिकांचा पैसा हा त्यांच्या फायद्यासाठी उपयोग करतील असाही आरोप बँकींग क्षेत्रातील संघटनेकडून केला जात आहे. तसेच बँकेत भारताबाहेरील भाग भांडवल गुंतवणूक करण्याला प्रोत्साहन देण्याची शक्यता आहे.
हेही वाचा-शरद पवारांचा काँग्रेसला धक्का, केरळमधील बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश
शेतकऱ्यांच्याधर्तीवर बँक संघटनांचा विरोध असणार-
दिल्लीत शेतकऱ्याच्या विरोधात असणारे कायदे आज सरकार बहुमतात असल्याने मागे घेणार नाही. असे असले तरी ज्या पद्धतीने आंदोलनातून विरोध पाहायला मिळत आहे. त्याचा परिणाम होणार आहे. शेतकरी आंदोलनाला समर्थन आणि सरकारच्या भूमिकेला बँक संघटनांनी विरोध केला आहे.