नागपूर : खाद्यपदार्थ बनविण्याचे अनेक विश्वविक्रम नावावर केलेले प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर १६ ऑक्टोबर रोजी जागतिक खाद्यान्न दिनाचे ( World Food Day ) औचित्य साधून एक नवा विक्रम करणार आहेत.शेफ विष्णू मनोहर दोन हजार किलोचा कुरकुरीत चिवडा ( Chef Vishnu manohar make specials chivada ) तयार करणार आहेत. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात चिवडा तयार करण्याचा हा पहिलाच प्रयोग असेल, त्यामुळे संपूर्ण नागपूरकरांचे लक्ष याकडे लागलेलं आहे.
विष्णू मनोहर यांचा १४ वा विश्व विक्रम - दोन हजार किलोचा चिवडा बनवण्याचा हा विष्णू मनोहर यांचा १४ वा विश्व विक्रम ( Vishnu manohar 14 th world record ) असेल. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी आणि अमृता फडणवीस ( Kanchan gadkari and Amruta Fadvanis) यांच्या हस्ते या चिवड्याचे मोफत वितरण करण्यात येणार आहे. यापूर्वी गणेशोत्सवा दरम्यान त्यांनी अडीच हजार किलोचा सातळलेल्या डाळीचा प्रसाद केला होता.
जागतिक खाद्यान्य दिनाचे निमित्त - नागपूर शहरातील रामदासपेठच्या विष्णूजीकी रसोई येथे सहा हजार किलोच्या अवाढव्य कढईत चिवडा तयार करण्यात येणार आहे. दिवाळी आणि जागतिक खाद्यान्न दिवसाचे निमित्त साधून चिवडा तयार करण्याचा निर्णय शेफ विष्णू मनोहर यांनी घेतला आहे.कुरकुरीत चिवडा तयार करण्यासाठी मध्य प्रदेशातील उज्जैन येथून ६०० किलो चिवडी आणण्यात येईल. याशिवाय बदाम, काजूही त्यात असणार आहे.
चिवड्यासाठी लागणारे साहित्य - दोन हजार किलोचा कुरमुरीत चिवडा तयार करण्यासाठी शेंगदाणा तेल ३५० किलो, शेेंगदाणे १०० किलो, काजू,किसमीस १०० किलो, डाळवा व खोबरे प्रत्येकी ५० किलो, हिंग व जीरे पावडर प्रत्येकी १५ किलो, मिर्ची पावडर ४० किलो, कढीपत्ता व सांभार प्रत्येकी १०० किलो, वाळलेले कांदे ५० किलो, धने पावडर ४० किलो लागणार आहे.
विश्वविक्रमी विष्णू मनोहर - प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर नेहमीच काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असतात. काहीं दिवसांपूर्वी त्यांनी गणेशोत्सवात अडीच हजार किलोचा सातळलेल्या डाळीचा प्रसाद केला होता. यापूर्वी त्यांनी ५ फूट लांब आणि ५ फूट रुंद असा "सर्वात लांब पराठा' तयार केला होता. ७ हजार किलोची महा मिसळ तयार करण्याचा विश्वविक्रम मनोहर यांच्या नावावर आहे. मनोहर यांनी ३ हजार २०० किलो वांग्याचे भरीत केले होते. यावर्षी दोन हजार किलो चिवड्या बनवण्याचा मनोहर यांचा १४ वा विश्व विक्रम राहाणार आहे. सलग ५३ तास स्वयंपाक करून विश्व विक्रम करणारे ते जगातील एकमेव शेफ आहेत.