नागपूर - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा व्हिडीओ समाज माध्यमात ( Nana Patole On Narendra Modi ) व्हायरल झाला. त्यानंतर आता भाजपाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ( Chandrashekhar Bawankule Demand Fir Nana Patole ) केली आहे. तसेच, नागपूर शहरात भाजपा युवा मोर्च्याच्यावतीने कॉटन मार्केट परिसरात नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
गोंदियात नागरिकांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी मी मोदींना मारु शकतो आणि शिव्या देऊ शकतो, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारु शकतो, असे वक्तव्य करुन समाजात तेढ निर्माण करणे. तसेच, प्रधानमंत्र्यांना मारण्याचा कट रचणे, असे गुन्हे नाना पटोलेंवर दाखल करण्याची मागणी कोई पोलीस स्टेशन यांच्याकडे करण्यात आली. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर, भाजपा नेते आनंदराव राऊत, अजय बोढारे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
भाजपा युवा मोर्चाकडून पटोलेंच्या पुतळ्याचे दहन
नागपुरात भाजपा युवा मोर्चाच्या वतीने कॉटन मार्केट परिसरात नाना पटोले यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी नाना पटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अपमान कधीही सहन करणार नाही, असा इशाराही देण्यात आला.