ETV Bharat / city

काँग्रेसकडून आशिष देशमुख प्रकरणात चौकशी सुरू, विदर्भ प्रभारी हांडोरे नागपुरात दाखल - केदार-देशमुख यांच्या घराण्यातील विरोध

काँग्रेसचे नेते माजी आमदार आशिष देशमुख यांच्यावर भाजपच्या उमेदवारासाठी प्रचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याची चौकशी करण्यासाठी विदर्भ प्रभारी चंद्रकांत हांडोरे नागपुरात दाखल झाले आहेत. मात्र, कामानिमित्त दिल्लीला जात असल्याचे आशिष देशमुख यांनी हांडोरे यांना सांगितले असल्याचे ते म्हणाले.

संपादित छायाचित्र
संपादित छायाचित्र
author img

By

Published : Sep 28, 2021, 6:55 PM IST

नागपूर - काँग्रेसचे महासचिव तथा माजी आमदार आशिष देशमुख यांच्या विरोधील तक्रारीची चौकशी करण्यासाठी काँग्रेसचे विदर्भ प्रभारी चंद्रकांत हांडोरे नागपुरात दाखल झाले आहे. चौकशीचा याचा अहवाल ते पक्षश्रेष्ठींनी सादर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी आगामी निवडणुकीचे अनुषंगाने लक्ष घालून संपूर्ण अहवाल देण्यासंदर्भात सूचना केल्याचेही सांगितले.

बोलताना हांडोरे व वसू

आशिष देशमुख दिल्ली रवाना

काँग्रेस नेते आशिष देशमुख हे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा सोडून भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करत आहे, असे व्हिडिओ, ऑडिओ आणि फोटो अशा पुराव्यासह कॉंग्रेसचे प्रकाश वसू यांनी तक्रार केली. तसेच युवक काँग्रेसकडून त्यांना हटवण्यात यावे, असा ठरावही युवक कॉंग्रेसने नागपूर ग्रामीणच्या बैठकीत मंजूर केला. मंत्री सुनील केदार यांच्यासह इतरही आमदारांशी हांडोरे चर्चा करणार आहेत. आशिष देशमुख यांच्यावरील तरक्रारीबाबत हांडोरे त्यांची बाजू जाणून घेणार होते. पण, कामानिमित्त दिल्लीला जात असल्याचे आशिष देशमुख यांनी सांगितले आहे.

आशिष देशमुख यांनी केदार यांच्यावर केले आरोप

नागपूर जिल्ह्याचे कॉंग्रेसचे नेते आशिष देशमुख हे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. काँग्रेस पक्षाचेच नेते आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांच्या दोन दशक जुने जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रकरण न्यायालयात असून त्याचे वकील बदलवण्यात आला असून काँग्रेसचे लिगल सेलच्या प्रमुखांची सरकारी वकील नियुक्ती केली. तसेच 210 कोटींचा घोटाळा केला असल्याचेही आरोप करत त्यांना मंत्रीपदवरून काढावे, अशी तक्रार आशिष देशमुख यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षात केली. तसेच अवैध उत्खनन संदर्भात लक्ष हरित लवादलाही देशमुख यांनी केदार यांच्या विरोधात तक्रार केली होती.

मंत्री सुनील केदार यांनीही काँग्रेसशी बेईमानी करणाऱ्या लाथा घाला असे केले होते वक्तव्य

काँग्रेस पक्षाशी कोणी बेइमानी करत असेल तर त्यांना लाथा घाला. पोलीस केस झालीच तर मी पाहून घेईन, असे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी देशमुख यांचे नाव न घेता नागपूर ग्रामीण काँग्रेस समितीच्या बैठकीत म्हणाले होते. काहीही अडचण असल्याचे मला एक फोन करा, मी मंत्रीपद बाजूला ठेऊन येतो, असेही ते म्हणाले होते.

पुराव्यासह आशिष देशमुख यांच्या विरोधात तक्रार

भाजपचे भिष्णूरचे जिल्हा परिषदेचे उमेदवार यांचे नाव घेऊन त्यांना होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर मतदान करून त्यांना निवडून द्या, असा प्रचार करतानाच्या व्हिडिओ पुराव्यासह तक्रार आली आहे. भिष्णूर-सावरगाव येथील भाजपच्या उमेदवार पार्वतीबाई कालबांडे, यांचा प्रचार करताना भाजपचे झेंडे लागलेल्या मंचावर बसून भाजप कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असल्याचे फोटो पुरावे म्हणून मिळाल्याचे चंद्रकांत हांडोरे यांनी सांगितले.

केदार-देशमुख यांच्या घराण्यातील विरोध या पिढीतही

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब केदार व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांच्यातही राजकीय वाद व गटबाजी होती. या पिढीत पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आणि आशिष देशमुख यांच्यातही असेच राजकीय हेवेदावे दिसून येत आहेत. पण, सुनिल केदार हे काँग्रेसच्या तिकिटावर पाच वेळ आमदार म्हणून निवडून आले असून सध्या मंत्रिपदी विराजमान आहेत. आशिष देशमुख हे 2009 मध्ये भाजपकडून सावनेर मतदार संघातून सुनील केदार यांच्या विरोधात लढले होते. मात्र, 3 हजार मतांच्या फरकाने देशमुख यांचा पराभव झाला.

आशिष देशमुख यांचा राजकीय प्रवास

2014 मध्ये काटोल मतदार संघातून आशिष देशमुख हे त्यांचे काका अनिल देशमुख यांचा पराभव करून भरघोस मतांचा फरकाने निवडून आले. त्यानंतर त्यांनी विविध कारणांनी भाजपमध्ये असतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात वक्तव्य केल्याने त्यांनी 2 ऑक्टोबर, 2018 मध्ये वर्ध्याच्या रामनगर मैदानावर झालेल्या काँग्रेसचे नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ते मंचावर दिसून आले. त्यानंतर काँग्रेसने देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात 2019 मध्ये आशिष देशमुख यांना मैदानात उतरवले. पण, देशमुख यांचा पराभव झाला. आता पुन्हा काँग्रेसमध्ये मन रमत नसल्याची चर्चा आहे. काँग्रेस पक्षात वडील रणजित देशमुख यांचे हे पक्षात महत्त्व होते ते महत्व त्यांना अद्याप मिळवता आले नाही. पण, पक्षविरोधी कारवाई सुरू असल्याने त्यांच्यावर कारवाई होणार की त्यांना समज दिली जाणार यात नेमक्या काय घडामोडी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यात आशिष देशमुख यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्याने प्रतिक्रिया कळू शकले नाही.

हेही वाचा - बेशरम टोल नाका : रस्त्यावरील जीवघेणे खड्डे दुरुस्त करण्याऐवजी सर्रास टोल वसुली; राष्ट्रवादी आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.